Weather Today : महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह पाऊसाची शक्‍यता; तुमच्या गावात कसे राहील हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Weather Today) शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजचे आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात तुरळक तर नाशिक अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यात वादळाशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्‍या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्‍यम पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे असे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे. 6 मार्च ते 7 मार्च या कालावधीत गुजरात व मध्य महाराष्ट्रात, 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुमच्या गावात कसे राहील हवामान?

शेतकरी मित्रांनो तुमच्या गावातही वादळी पाऊस पडणार काय हे अगोदर माहिती करून घेणे आता अतिशय सोपे झाले आहे. आपल्या गावातील पुढील ५ दिवसांचा अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला हवामान अंदाज, सरकारी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी दुकान आदी अनेक शेतीउपयोगी सेवा मोफत दिल्या जातात. आजच गुगल प्ले स्टारवरून Hello Krushi अँप इंस्टाल करून या सेवेचे लाभार्थी बना.

error: Content is protected !!