Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 7 दिवस पावसाची शक्यता; वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही पुढील ७ दिवस तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अतिशय महत्वाचा अंदाज दिला आहे.

https://twitter.com/RMC_Nagpur

मराठवाडयात दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान व दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!