Weather Update : राज्यात अवकाळीचा धुमाकूळ सुरूच; पुणे, अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वारे अन विजांचा कडकडाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) | वादळी पाऊस आणि वाऱ्याने राज्यातील विविध भागात तडाखा बसला आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमानात उकाडा जाणवत आहे. आज ( ता.१०) दिवशी विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली असून इतर भागात विजांच्या कडकडाटासह मेघराजा हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (weather Department) वर्तवली आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसाची हजेरी या वातावरणामुळे राज्यातील कमाल आणि किमान वातावरणात चढ – उतार पहायला मिळतो. राज्यात बहुतांश भागात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान पहायला मिळालं. त्यातील ३७.३ सेल्सिअस तापमान हे रत्नागिरीत पहायला मिळालं. निफाड ३७, जळगाव ३६.५ अंशावर पोहचले. इतर भागात २८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान पहायला मिळते. रोजच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर होतो. हे वातावरणातील बदल जाणून घेण्यासाठी आजच Hello Krushi ॲप डाऊनलोड करा.

शेतातील नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ अँप वापरा

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्ही गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या गावातील रोजचे अचूक हवामान अंदाज समजून घेता येते. यामुळे शेतकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान टाळता येते. तसेच यासोबत हवामान आधारित तज्ज्ञांचा पीक सल्लासुद्धा मोफत देण्यात येतो. Weather Update

राजस्थान तसेच इतर परिसरातील समुद्रसपाटीपासून १.५ किमी. चक्राकार वारे हे विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते केरळ समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर कमी हवेचा दाब असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.

error: Content is protected !!