Weather Update : पुढील काही तासांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह मेघगर्जना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडयात दि. 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 10 ते 16 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 17 ते 23 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

असा मिळवा पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे. कारण आता एकही रुपया खर्च न करता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज मोबाईलवरून मिळत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. यांनतर हॅलो कृषीचे मोबाईल अँप Install करून मो. ना. टाकून रजिस्ट्रेशन केल्यांनतर तुम्हाला होम स्क्रीनवरच तुमच्या गावाचे नाव येते. तसेच हवामान अंदाज या विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा अचूक हवामान अंदाज जाणून घेतो येतो.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ते 21 मार्च 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

  • दिनांक १३ मार्च : रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात
  • दिनांक १४ मार्च : रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यात
  • दिनांक १५ मार्च : रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात

सौजन्य :
डाँ. के. के. डाखोरे
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.

error: Content is protected !!