Weather Update : आज राज्यात ‘या’ भागात गारपीटीची शक्यता; हवामान विभागाने जारी केला येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : यंदाच्या वर्षी गारपिटीने शेतकऱ्याला हैराण केलं आहे. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागला आहे. काल (ता.१३) या दिवशी हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी सांगितल्या प्रमाणे नाशिक आणि पुणे विभागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज राज्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज या भागात गारपिटीची शक्यता, येलो अलर्ट जारी

आज (ता.१४) एप्रिल या दिवशी राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, साताऱ्यात गारपिटीचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच मराठवाडा विभागात परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर त्याचप्रमाणे विदर्भात बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या भागात गारपीट होणार असल्याने येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

https://youtu.be/PtgqpmaBGJY

आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवा

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाचे ॲप इंस्टॉल करा. त्या ॲपमध्ये आपल्याला स्वतःच्या गावातील अचूक हवामान अंदाज समजतो. तसेच आपल्या शेतातील हवामान कसे राहील याबाबत माहिती देण्यात येते. यासह जमीन मोजणी, नकाशा व सातबारा उतारा काढणे, सरकारी योजनांना अर्ज करणे, जमीन खरेदी विक्री, प्राणी खरेदी विक्री, शेतकरी दुकान अशा अनेक सेवा मोफत देण्यात येतात.

या भागात अवकाळी पाऊसाची शक्यता

कोकण भागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात गारपिटीचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर,नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, सांगली तसेच मराठवाडा विभागातील धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती, अकोला भागात गारपीट होण्याची अधिक संभावना असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

error: Content is protected !!