Weather Update : पुढील 7 दिवस मराठवाड्यात कसे असेल हवामान? तापमानात किती वाढ होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे

आज जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात ८ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई येथे राज्यातील सर्वाधिक १८.२ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात सर्व भागात तापमानात वाढ पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागले दिला आहे.

असे मिळवा तुमच्या गावातील हवामान अंदाज –

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपच्या मदतीने शेतकरी अचूक हवामान अंदाज जाणून घेऊन त्यानुसार शेतामध्ये पिकांची काळजी घेऊ शकतो. Hello Krushi अँपच्या साहाय्याने लाखो शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करून प्रगतशील शेती करत आहेत. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून या मोफत सेवेचे लाभार्थी बना.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे

मराठवाडयात दिनांक 17 ते 23 फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
Nanded 15.8
Satara 15.4
Jalgaon 8
Parbhani 14.5
Aurangabad 11.7
Mum Scz 18.2
Nashik 10.7
Pune 9.4
MWR 15.9
Udgir 15.4
Baramati 11.4

error: Content is protected !!