Weather Update : अजून पावसाचे सावट कायम; हवामान विभागाने दिला पुन्हा गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी चिंतेत आहे. अजून पुढील २,३ दिवस हवामानातील गंभीर इशारे हवामान विभागाने दिले आहेत.

१९ मार्च पर्यंत महाराष्ट्रासह छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील विदर्भात अनेक ठिकाणी आज गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने उत्तर भारतातही १९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये वादळी वारे, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वारे, गारपीटीमुळे रब्बीचा हंगाम अडचणीत आला आहे.

असा मिळवा तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज मिळणे शक्य झाले आहे. Hello Krushi या मोबाईल अँप वर हवामान अंदाजासोबत रोजचा बाजारभाव पाहतो येतो. तसेच सातबारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्र सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. यानंतर हॅलो कृषीचे अँप इन्स्टॉल करून मो.न. टाकून रजिस्टर करायचं. आता तुम्हाला या सर्व शेती उपयुक्त सर्व सेवांचा मोफत लाभ घेता येऊ शकेल.

शेतीचे नुकसान होण्याची शक्यता

वादळी वारे आणि पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांची काढणी सुरु आहे. उत्तर भारतात काढणीला आलेल्या गव्हाला पावसाचा मोठा फटका बसणार आहे. यापार्श्वभूमीवर विमा भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

error: Content is protected !!