पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! ‘या’ जिल्ह्यांत विजांसह अवकाळी पाऊस होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यामुळे वातावरण 40 अंशापलिकडे गेले आहे. यामुळे उन्हाचा चटका पहायला मिळतो. विविध भागात गारपिटीसह वादळी पाऊस देखील पहायला मिळतो. आज (ता.१७) सोमवार या दिवशी अवकाळी पावसासह मराठवाड्यात गारपीट होणार असून दक्षिण महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Dept) वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

काल (ता.१५) रविवार या दिवशी जळगावात ४१ अंशाच्या वर तापमान पहायला मिळाले होते. यवतमाळ, धुळे येथे ४० अंशावर तापमान गेल्याचं पहायला मिळालं. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून ते तामिळनाडूपर्यंत समुद्राचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवा

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाचे ॲप इंस्टॉल करा. त्या ॲपमध्ये आपल्या गावात आज किती पाऊस पडेल. तसेच आजचे नेमके हवामान काय आहे? कसे आहे? याबाबत या ॲपद्वारे माहिती मिळू शकते. यासह जमीन मोजणी, नकाशा मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा उतारा हि सर्व माहिती या ॲपद्वारे मिळू शकते.

खालील विभागातील शहरात येलो अलर्ट जारी :

मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर, नांदेड या शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या शहरात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहेत.

error: Content is protected !!