Weather Update : पुढच्या 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा वादळी पाऊसाची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात वादळी वारे आणि पाऊसाने शेतीचे (Agriculture News) मोठे नुकसान केले आहे. मराठवाडा, विदर्भाला गारपिटीने झोडपल्याने पिकांची हानी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुन्हा हवामान विभागाने (IMD Pune) एक अलर्ट जारी केला असून पुढल्या २४ तासांत वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत आज, उद्या पाऊस होऊ शकतो याबाबत आम्ही खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार काय?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.

राज्यात वादळी वारा आणि पावसाळा पोषक असे हवामान तयार झाले आहे. २२ मार्च रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी झाल्या. तर आज गुरुवारी (ता. २३) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान शास्त्रज्ञ के एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी पावसाच्या शक्यतेबाबत शेतकऱ्यांना महत्वाची माहिती सांगितली आहे. उद्यापासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं होसाळीकर यांनी ट्विट करून कळवले आहे.

तसेच सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबत विदर्भावरहि याचा अधिक परिणाम होऊ शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात विजांसह वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आज काय तापमान आहे?

पुणे २९.८ (१४.९)
नगर ३०.० (१५.८)
जळगाव ३१.७ (१६.५)
धुळे ३१.५ (१३.२)
कोल्हापूर ३२.८ (१९.२)

महाबळेश्वर २१.८ (११.२)
नाशिक २९.४ (१६.२)
निफाड ३०.६(१३.५)
सांगली ३२.६ (१८.७)
सातारा २९.३ (१५.८)

सोलापूर ३४.८(२०.४)
सांताक्रूझ ३१.६ (२२.४)
डहाणू ३१.६ (२१.९)
रत्नागिरी ३१.८ (२१.४)
छत्रपती संभाजीनगर ३०.८ (१९.०)

नांदेड – (२०.६), परभणी ३३.३ (२०.६)
अकोला ३२.९ (१९.७)
अमरावती ३२.६(१९.४)
बुलढाणा ३०.८ (२०.२)
ब्रह्मपूरी ३४.१ (२०.६)

चंद्रपूर ३५.८ (२१.०)
गडचिरोली ३१.२(१७.८)
गोंदिया ३१.० (२०.४)
नागपूर ३३.२ (२१.६)

वर्धा ३४.१(२१.४)
वाशीम ३३.२ (१८.८)
यवतमाळ ३४.५ (२१.२)

error: Content is protected !!