हॅलो कृषी ऑनलाईन । जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात तापमानात (Weather Update) बऱ्यापैकी घट होऊन थंडी वाढत असते. त्यांनतर फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून हळू हळू थंडी ओसरायला सुरवात होते. मागील दोन आठवडे राज्यात थंडीने अक्षरशः हुडहुडी भरली होती. त्यानंतर आता तापमानात काहीशा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
आपल्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज कसा मिळवायचा?
शेतकरी मित्रांनो आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी मोबाईलवर असणाऱ्या गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्हला Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करावं लागणार आहे. इथे हवामान अंदाजासोबतच तुमच्या जवळील सर्व बाजारसमित्यांचे रोजचे बाजारभाव पाहता येतात. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्रेही डाउनलोड करता येतात. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या सेवेचा लाभार्थी बाणा.
आज राज्यात औरंगाबाद येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात 11.6 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यांनतर पुणे (Pune) जिल्ह्यात 12.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. बाकी राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारणपणे १५ डिग्री सेल्सिअस हुन अधिक तापमान नोंद झाले आहे.
यामध्ये ठाणे (Thane) 18 डिग्री सेल्सिअस, उदगीर (Udgir) 17.6 डिग्री सेल्सिअस, सोलापूर (Solapur) 19.3 डिग्री सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण, मराठवाडा या भागात तापमान अधिक असल्याचे दिसत आहे.
तुमच्या जिल्ह्यात किती तापमान हे चेक करा (Weather Update)
Thane 18
Udgir 17.6
Slp 19.3
Klp 17.7
Jalgaon 13.8
Rtn 17.6
Satara 14.5
Colaba 17.6
Scz 14.8 🙄
Jalna 17
Baramati 13.2
Aurangabad 11.6🙄🙄
MWR 14.4
Parbhani 16.7
Nanded 16.6
Dahanu 15
Pune 12.3 🙄
Osbad 15.9