Weather Update : पुढील 4 तासात ‘या’ जिल्ह्यांत सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाचा अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यात अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून सतत राज्यात या ना त्या जिल्ह्यात वादळी वारे, अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने ३० एप्रिल पर्यंत राज्यात अनेक भागात पाऊसाचा अंदाज वर्तवला आहे. आता पुढील ४ तासांत राज्यातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बीड, परभणी, संभाजीनगर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुमच्या गावात वादळी पाऊस होणार का हे अगोदरच कसे जाणून घ्यावे?

शेतकरी मित्रांनो हवामानात रोज बदल होत असतो. हवामानाचा परिणाम हा शेतीवर होतो. मात्र आता शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाचे टेन्शन कमी झाले आहे. कारण Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने सध्या लाखो शेतकरी आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेऊन योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे शेतीमधील संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर नाव, मोबाईल नंबर आदी माहिती भरून फ्री रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही हॅलो कृषी च्या लाखो शेतकऱ्यांसोबत जोडले जाल. Hello Krushi अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, पशुपालन, सातबारा उतारा, सरकारी योजना, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अशा अनेक उपयोगी सेवा एकही रुपये खर्च न करता मिळू शकतात.

मराठवाडा व मध्य महाराष्टरातील काही भागात आज ढगाळ वातावरण असून गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि 30-40kmph वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत अतिशय महत्वाची माहिती सांगितली असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)

राज्यात मागील मार्च महिन्यापासून अवकाळी पाऊस पडतोय. सध्या सुरू असलेला एप्रिल महिना संपत आला तरीही अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. अशातच येत्या दोन दिवसात (२९,३०) एप्रिलमध्ये मराठवाडा, विदर्भात विजांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी अंदाज वर्तवला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील बुलढाणा, वाशीम, जळगाव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, सोलापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर , अकोला, अमरावती, संभाजीनगरचा काही अंशी भाग या ठिकाणी येत्या ३० तारखेपर्यंत अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर भागात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात पाऊस होईल. तसेच सातारा आणि सांगलीत काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतात न बांधता, स्वतः झाडाखाली उभे न राहता. स्वतःची काळजी घेऊन स्वतःचे संरक्षण करावे. तसेच ज्या भागात पाऊस होणार नाही त्याभागात अधिक वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

error: Content is protected !!