Weather Update : आज ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची दाट शक्यता, तुमच्या गावात कसे राहील हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : मागील महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नफ्याचे रूपांतर तोट्यात झाले. अशाचप्रकारे आज राज्यातील विदर्भात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील इतर भागात नेहमीप्रमाणे ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पहायला मिळेल.

विदर्भात पावसाची शक्यता, नेमकं काय आहे कारण

छत्तीसगडमधील काही भाग,तेलंगणा, आंध्रप्रदेश,तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राजस्थानमधील काही भागात समुद्रसपाटीच्या १.५ किमी चक्राकार वाऱ्याची स्थिती उपस्थित झाली आहे. यामुळे राज्यात अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे विदर्भातील विभागात आज अवकाळी पावसाची शक्यता नोंदवली असून येथील काही विभागांचे तापमान पुढीलप्रमाणे :

विदर्भातील विभागांचे तापमान (Weather Update)

विदर्भातील अकोला शहराचे तापमान हे ३८.२ आहे. तसेच अमरावतीचे तापमान हे ३७. ४ तापमान आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा येथे ३५.४ तापमान आहे. ब्रह्मपुरीत ३८.१ अंश सेल्सिअस तापमान आहे. चंद्रपूरात ३८.२ हे सर्वाधिक तापमान आहे. गडचिरोलीत ३५.८ तर गोंदियात ३६.४ इतके तापमान आहे. नागपुरात ३७.१ आणि वर्ध्यात ३८.१ वाशिमध्ये ३७.५ आणि यवतमाळमध्ये ३७.५ वातावरण राहणार आहे. हा हवामान अंदाज इंडीयन मेटोरोजिकल डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स (Indian Meteorogical Department Ministry Of Earth Science) या हवामान खात्याने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे आपल्या Hello Krushi या ॲपदेरे देखील हवामान अंदाज पाहू शकता.

ॲपद्वारे पाहा हवामानाचा अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेणे शक्य झाले आहे. तुम्ही जर अजूनही Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi मोबाईल अँप डाउनलोड करा. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांका जोडून रजिस्टर करा. हॅलो कृषी अँपवर रोजच्या हवामानाबद्दल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे पिकांचे बऱ्याचदा नुकसान होते. यासाठी नेमकी काय दक्षता घ्यावी ही माहिती त्यात नमूद केली आहे. यासोबत रोजचा बाजारभाव, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री, जनावरे खरेदी विक्री, सातबारा डाउनलोड आदी सेवा या अँपवर मोफत दिल्या जातात.

error: Content is protected !!