Weather Update : आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई (Weather Update) : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना गुरुवारी, शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपले. तसेच पश्चिन महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यानंतर आता आज देखील राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन ते तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. तसेच 07 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी व धाराशिव जिल्हयात पाऊसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले.

तुमच्या गावात पाऊस पडणार काय?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.

आज कोणत्या जिल्ह्यांत पाऊसाचे हजेरी?

आता आज दिनांक 08 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. Weather Update

मराठवाडयात दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान व दिनांक 14 ते 20 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून “Hello Krushi” अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

error: Content is protected !!