हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. मागील ७ दिवसांत अनेक भागात उन्हाचा कडाका वाढल्याने पारा चढलेला आहे. अशात आता उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता यावेळी हवामान विभागाने दिली आहे.
तुमच्या गावात पाऊस पडणार काय?
शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.
सध्या उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यातील काही भागात तुरळक व हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. दिनांक ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, वाशीम, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता नागपूर कार्यशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.