धक्कादायक बातमी! 100 हुन अधिक गाईंना हॅलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय; काय आहे कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । गाईला (Cow) भारतात पूजनीय स्थान आहे. शेतकऱ्यांसाठी गाई अतिशय उपयुक्त प्राणी मानला जातो. गाईचे दूध, शेण, गोमूत्र या सर्वच बाबी अतिशय उपयुक्त असल्याने गाईला गोमाता असं म्हटलं जातं. परंतु आता १०० हुन अधिक गाईंना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. कोणत्या गाईंना गोळ्या झाडण्यात येणार आहेत? असा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्न यानंतर अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर अनेकजण या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहेत.

अमेरिकेतील एक जंगलात साधारणपणे १५० गाईंना गोळ्या झाडून ठार मारण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असून नेमबाजांची एक टीम यासाठी तयार करण्यात आली आहे. दुर्बीण आणि बंदूक या दोन गोष्टी या नेमबाजांकडे देण्यात आल्या असून हेलिकॉप्टर जंगलातून फिरवले जाणार आहे. यावेळी जिथे कुठे गाई दिसेल तिथे गाईंना गोळ्या झाडण्यात येणार आहेत. मेक्सिकोच्या वाइल्डरनेस जंगलातहे ऑपरेशन करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या वन विभागानेही याकरता मान्यता दिली आहे.

अशी करा घरबसल्या जनावरांची खरेदी विक्री

शेतकरी मित्रांनो आता जनावरांची खरेदी विक्री तुम्ही घरी बसूनही करू शकता. Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने आता हव्या त्या जनावरांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येणे शक्य झाले आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.

गाईंची हत्या करण्याचा निर्णय का?

न्यू मेक्सिकोच्या गिला वाइल्डरनेसमध्ये डझनभर जंगली गुरेढोरे मारण्यासाठी हेलिकॉप्टरने वाहून नेणाऱ्या नेमबाजांच्या योजनेला अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, असे यूएस फॉरेस्ट सर्व्हिसने या आठवड्यात सांगितले. गुरुवारपासून सुरू होणार्‍या या चार दिवसांच्या ऑपरेशनमध्ये सुमारे 150 भटक्या गायींना ठार करण्यात येणार आहे. या गाई जंगलातील धोक्यात असलेल्या प्रजातींची परिसंस्था नष्ट करत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. गिलाच्या उंच पर्वत आणि अतिप्रचंड दरींमधील लुप्तप्राय प्रजातींच्या परिसंस्थेचा नाश रोखण्यासाठी गाईंना तेथून हटवणे गरजेचे आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वन्य गायींच्या हत्येला विरोध सुरू

अमेरिकेच्या वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोधही सुरू झाला आहे. वन्यप्राण्यांवर थेट गोळीबार करण्यापेक्षा मानवतेची पावले उचलावीत, असे बोलले जात आहे. ही क्रूर पद्धत योग्य नाही त्यामुळे याबाबी पुनर्विचार व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे. सोशल मीडियातही अनेकजण या गाईंना जीवे मारण्यापेक्षा त्यांचे तेथून पुनर्वसन करावे अशी मागणी करत आहेत. भारतातूनही अमेरिकेच्या या मागणीला विरोध केला जात आहे.

तुमच्या गावाजवळील जनावरांच्या डॉक्टरांशी असा करा केव्हाही संपर्क

शेतकरी मित्रांनो दुग्धव्यवसाय म्हटले कि जनावरे आली. आणि पशुपालन म्हटले कि पशूंचे वेगवेगळे आजार आले. मात्र आता तुम्हाला पशु चिकित्सक सेवा एका फोन वर उपलब्ध होणार आहे. तुमच्या गावाजवळील सर्व जनावरांच्या डॉक्टरांशी केव्हाही संपर्क करणे आता Hello Krushi मोबाईल अँपमुळे सहज शक्य झाले आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi मोबाईल अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.

error: Content is protected !!