कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात दरवर्षी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे विक्रीच्या घटना दरवर्षी घडत असल्याचे आपण सातत्याने पाहत असतो. मात्र याच बोगस बियाणे विक्रीला आळा बसण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करण्यात येणार असून यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज अकोला येथे येथील एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. यावेळी सत्तार म्हणाले, ज्या विक्रेत्याकडे बोगस बियाणे, बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी लगेच ती नष्ट करावी नाहीतर राज्यपालांकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस बियाणांची विक्री करणाऱ्याला कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत बोगस बियाणांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे काम राज्य सरकारने केलं आहे. राज्यात दरवर्षी पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठं नुकसान होत आहे. आज मी राज्याचा कृषिमंत्री असून शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जर शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही तर शेतकरी मला कधीच माफ करणार नाही असे सत्तार यांनी यावेळी म्हंटल.

error: Content is protected !!