PM Kisan FPO Scheme : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार कडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

PM Kisan FPO योजनेचा लाभ कोणाला होणार ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे शेतकरी शेतीशी संबंधित उपकरणे किंवा खते, औषधे आणि बियाणे यासारख्या गोष्टी खरेदी करू शकतील. माहितीनुसार, 2023-24 पर्यंत 10 हजार एफपीओ तयार करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

तुम्हालाही सरकारचे 15 लाख हवे असतील तर हे काम करा

  • शेतकरी मित्रांनो सरकारी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल App डाउनलोड करून घ्यायचे आहे.
  • यानंतर आता मोबाईल नंबर, नाव, गाव आदी माहिती भरून Hello Krushi अँपवर मोफत रजिस्ट्रेशन करा.
  • आता App ओपन केल्यानंतर होमपेजवर सरकारी योजना हा विभाग निवडा.
  • सरकारी योजनांमध्ये गेल्यानंतर PM Kisan FPO Scheme यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला योजनेंबाबत सविस्तर माहिती वाचता येईल.
  • योजनेला अर्ज कारणासाठी खाली दिलेल्या Apply Now या बटनावर क्लिक करून अर्ज करा.

नोंदणीसाठी, तुम्हांला FPO चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापकीय संचालक (MD) किंवा व्यवस्थापक यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक प्रदान करावा लागेल. तसेच यासंबंधीची कागदपत्रेही द्यावी लागतील. याशिवाय FPO च्या उच्च अधिकाऱ्यांचे बँक डिटेल्सही द्यावे लागतील. यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोडचा समावेश असेल.

सरकारी योजनेला अर्ज कसा करायचा?

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या महा ई -सेवेत जाऊन चकरा मारण्याची गरज नाही. आत्ताच Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि घरबसल्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. हॅलो कृषीमध्ये या व्यक्तिरिक्त, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकटात मिळत आहेत. यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

error: Content is protected !!