वनरोपवाटिकेतून महिला बचतगटाने तयार केली ओळख; 50 महिलांना मिळाला रोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । महिला सशक्तीकरण करण्यासाठी बचत गट किती प्रभावी आहे याचे एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी गावातील महिलांनी एकत्र येऊन श्री गणेश ग्राम बचत गटाची स्थपणा केली आणि या बचत गटामार्फत वणीकरणासाठी लागणाऱ्या रोपांची रोपवाटिका तयार करून एक वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण केली. खेड्यातील महिला ह्या घरकामा व्यतिरिक्त इतर कामही करत असतात. घराला थोडाफार त्यांचा हातभार लागेल असा प्रयत्न करत असतात.

या गटातील सदस्या सरिताताई माने यांचे माहेर खंडोबाचीवाडी आणि सासर शिरटे. 2005 मध्ये सारिताईंच्या पतीचे निधन झाले. तश्या त्या माहेरी राहतात. पतीच्या दुःखातून सावरुन त्यांनी एका गारमेंट मध्ये काम सुरू केले. पण 3 महिन्यात हा गारमेंट उद्योग बंद पडला. या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी 2007 साली बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला त्यानी पापड, लोणचे बनवण्याचा प्रयत्न केला पण ते विकण्यासाठी अडथळे येऊ लागले. त्यानंतर त्यांनी गारमेंटचा पण व्यवसाय करण्याचे ठरवले पण तेवढे भांडवल नव्हते.

त्यांच्या परिसरातील मागणी लक्षात घेऊन त्यांनी 2009 मध्ये रोपांची निर्मिती सुरू केली आणि खेड्यातील 50 महिलांना रोजगार मिळाला. रोपवटीकेसाठी लागणारी 1 एकर जमीन त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली. त्यांना अनेक वनाधिकारी, कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्या म्हणतात की “रोपवाटिका चालवण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांना बियाणे, रोपे काशी बनवायची, कोणती पिशवी वापरायची याचे योग्य मार्गदर्शन मिळाले”.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!