इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना 51 लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळी अमिश दाखवून फसवणूक केल्याचा अनेक घटना आहेत. बऱ्याचदा बाजारभावाबद्दलही फसवणूक केली जाते. अशीच घटना आता राज्यातील शेतकऱ्यांसह घडली आहे. शेतकऱ्यांना इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. पुण्यातील ‘ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट’ संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काय होतं नेमकं प्रकरण :

सांगोला तालुक्यातील गौडवाडीचे पाच ते सहा शेतकरी डाळिंबाची शेती करत होते. त्यांच्याच काही शेतकरी मित्रांनी इस्त्रायल दौऱ्यावर शेतीचे अध्ययन करण्यासाठी पुण्यातील ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट संस्थेशी संपर्क साधला आहे. त्यांना शेतीच्या दौऱ्यासाठी अभ्यास करायचा असल्याचं सांगितलं होतं.

एकूण ३२ शेतकऱ्यांचे गटाने यासाठी मान्यता दिली होती. यासाठी सुमारे ६ दिवसांसाठी १ लाख ६० हजार रुपयांचा शेती अध्ययनासाठी रक्कम आकारली होती. त्यांना दौऱ्यावर नेलं नाही. त्यांची फसवणूक केली. त्यांना व्हिसा काढण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण देत दौरा पुढे ढकलल्याचे कडूस-पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आज अखेर शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर नेले नाही. अशी फसवणूक केल्याचं प्रकार घडला आहे. यामुळे फसवणूक दारांवर पोलीस तक्रार करण्यात आली.

फसवणूक दारांवर फिर्याद :

आटपाडी येथील महेश भाऊसाहेब कडुस – पाटील बिजलीनगर, चिंचवड, पुणे याच्याविरोधात नानासाहेब ऊर्फ अण्णा दादा गडदे यांनी फिर्याद दिली असल्याने पोलीस अजूनही तपास करत आहेत.

error: Content is protected !!