परराज्यात मिळतोय कांद्याला तगडा भाव ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांद्याचे सध्याचे भाव (Onion Rate) हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. उत्पादन जरी चांगले झाले असले तरी गडगडलेला भाव शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं देऊन जात आहे. राज्यात 100-200 रुपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे. एव्हढेच नाही तर आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या लासलगाव बाजारसमितीत देखील म्हणावा तसा दर कांद्याला मिळत नाहीये. महाराष्ट्रात ही कांद्याची स्थिती आहे . इतर राज्यात देखील कांद्याची हीच स्थिती असेल काय ? असा प्रश्न नक्कीच पडतो…

बिहारमध्ये कांद्याला (Onion Rate) हजार ते सोळाशे रुपये भाव मिळतो आहे. उत्तर प्रदेश मध्ये देखील कांद्याला बरा भाव मिळत केरळ मध्ये एका बाजारात तर कांद्याला 4500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील ठाकुरगंज बाजारात 15 मे रोजी कांद्याला किमान 1850 रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला होता. तर दोन हजार शंभर ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल दर तिथल्या शेतकऱ्यांना कांद्याला मिळाला. महाराष्ट्र ट्रेडर्स लॉबी मजबूत असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दे खोले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्र मध्ये चांगले उत्पन्न कांद्याचं (Onion Rate) झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर कांद्याला मिळत नाही. चार ते पाच रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे कांद्याला आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. शिवाय कांद्याचा उत्पादन चांगलं झालं असलं तरी भाव वाढल्यानंतर कांदा विकावा यासाठी शेतकऱ्यांना साठवणुकीचा पर्याय आहेत. मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडे साठवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे असं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या किमतीत कांदा विकण्याची नामुष्की येत आहे. कांदा विकून आलेल्या पैशात शेतीसाठी लागणारा खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यातील कांद्याचे ताजे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/05/2022
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल118536001100850
खेड-चाकणक्विंटल2256001000800
पुणे- खडकीलोकलक्विंटल208001000900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल176001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल4942001000600
लासलगावउन्हाळीनग114005001340850
कळवणउन्हाळीक्विंटल145002001400850
मनमाडउन्हाळीक्विंटल40001001064700
16/05/2022
कोल्हापूरक्विंटल58024001400900
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल152296001100850
लासूर स्टेशनक्विंटल85275725650
साताराक्विंटल31690011001000
मंगळवेढाक्विंटल791501200800
राहताक्विंटल48702001100750
पुणेलोकलक्विंटल63783001100700
पुणे- खडकीलोकलक्विंटल268001100950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1480012001000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल8780013001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल3433001000650
शेवगावनं. १क्विंटल12578001000800
शेवगावनं. २क्विंटल1424600700700
शेवगावनं. ३क्विंटल554100500100
येवलाउन्हाळीक्विंटल814850965625
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल402450858625
नाशिकउन्हाळीक्विंटल31583501100700
लासलगावउन्हाळीक्विंटल153584001446925
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल118905001312901
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल41121001000600
संगमनेरउन्हाळीक्विंटल1277680013011050
मनमाडउन्हाळीक्विंटल7549200975730
लोणंदउन्हाळीक्विंटल13734001000850
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल224705001100900
श्रीरामपूरउन्हाळीक्विंटल7500150955600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल261503251530900
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल1807250875700

Leave a Comment

error: Content is protected !!