शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार : उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबरोबरच सर्व सोलर पंप अर्जांना मंजुरी मिळणार असल्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळत नव्हती. काही शेतकऱ्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले होते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन केलं जात होतं मात्र आता त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानस बोलून दाखवला आहे की, शेतकऱ्यांना आपल्याला दिवसा वीज द्यायची आहे. आम्ही गडचिरोली ला गेलो असताना मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी आल्या की पैसे न भरल्यामुळे काही गावांचे वीज कनेक्शन्स हे स्ट्रीट लाईटचे बंद करण्यात आले आहेत. या संदर्भातच आज बैठक घेण्यात आली अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कृषी पंप योजना फास्टट्रॅकवर

2018 साली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये जे काही एग्रीकल्चरल फिडर आहेत जे सोलर वर टाकायचे जेणेकरून दिवसा शेतकऱ्यांना वीज देता येईल. त्या काळात साधारण 200 मेगावॅटचे काम पूर्ण करण्यात आलं होतं. पण नंतरच्या काळात त्याला थोडा ब्रेक बसला. आज पुन्हा एकदा ही योजना आम्ही फास्टट्रॅकवर आणली आहे. पुढच्या एका वर्षात किमान 30 टक्के ॲग्रीकल्चरल फिडर हे सौर उर्जेवर कसे आणता येतील जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल या संदर्भात आज निर्णय करण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेकडे आम्ही पाठवणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान दिली आहे.

थांबलेल्या योजना तात्काळ सुरु करणार

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच रस्त्यांच्या पथदिवे हे बिल न भरल्यामुळे बंद आहेत या बिलांवरील व्याज चक्रवाढ व्याज वाढत वाढत एकीकडे महावितरणची थकबाकी देखील मोठी दिसते आहे. दुसरीकडे गावांना देखील अडचणीचा सामना करावा लागतो आहे. आता जुनी सगळी थकबाकी वन टाइम सेटलमेंट सारखी महावितरण आणि राज्य सरकारने त्याचा निर्णय करावा राज्य सरकारने ती थकबाकी भरावी. ग्रामपंचायतीने राज्य सरकार जी काही मदत करेल त्या मदतीतून ही बिल भरावीत आणि सगळ्या थांबलेल्या योजना ह्या तात्काळ सुरू कराव्यात यासंदर्भातला निर्णयही आज घेण्यात आला आहे.

सर्व सोलारपंप अर्जांना मिळणार मंजूरी

2019 पासूनचे कृषी पंपाचे पेड पेंडिंग आहे. जवळपास सव्वा लाख लोकांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. त्या सगळ्यांना केंद्र सरकारची कुसुम योजना आणि राज्य सरकारच्या योजनेच्या अंतर्गत पुढच्या सहा महिन्यात पंप देऊन शेतकऱ्यांची गरज पूर्ण केली जणार आहे. अशा संदर्भातला आदेश मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्याबरोबरच उपसा सिंचन योजना सोलरवर कशा टाकता येतील हे देखील पाहिले जाणार आहे त्यामुळे सोलर वीज केल्यास बचत करता येईल. त्यासंदर्भातला अहवालही देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!