गांजाच्या झाडाला टमाटं कधी लागतील? पोस्ट होतेय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हल्ली माणूस सोशल मीडियाशी इतका कनेक्ट झाला आहे की रोजच्या जगण्यातील छोटे मोठ्या समस्यांसाठी लगेच सोशल मीडियावर पोस्ट टाकून आजकाल समस्यांचं समाधान शोधलं जातं. विशेष म्हणजे अनेक भन्नाट कमेंट मधून प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तरंही दिली जातात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ” झाड लावून 3 महिने झाले तरी अजून टमाटं आलं नाही, तज्ञांनी मार्गदर्शन करावं..” अशी ही पोस्ट आहे. मात्र या पोस्ट सोबत जो फोटो दिला आहे ते पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. कारण या फोटोतलं झाड काही टोमॅटोसारखं दिसत नाहीये…

हे तर चिलीम भरायचं झाड त्याला टोमॅटो यीन कुठून ?

तर मित्रानो, खरं चित्र असं आहे की ज्या व्यक्तीने हा फोटो पोस्ट केला आहे. तो आहे गांजाच्या झाडाचा आणि त्याने पोस्ट लिहिताना प्रश्न विचारला आहे की याला टोमॅटो कधी येतील ? अनेकांनी या पोस्टवर कमेंट करीत हे झाड गांजाचं आहे असे सांगितले आहे. तर कुणी आंबाडीची भाजी आहे असेही सांगितलं आहे. शिवाय अनेकांनी मजेशीर कमेंट करीत पोलिसांना फोन करा तेव्हा कळेल असं सांगितलं आहे.

ही पोस्ट “थोडंसं मनातलं” नावाच्या फेसबुक ग्रुप वर शेअर करण्यात आली आहे. संतोष शिराळकर असं ही पोस्ट लिहिणाऱ्या फेसबुक युजरचं नाव आहे. या पोस्टमध्ये गांजासारख्या दिसणाऱ्या झाडाचा फोटो दिला असून “झाड लावून तीन महिने झालेत तरी अजून टमाटं आलं नाही, तज्ञांनी मार्गदर्शन करावं..” असे लिहिले आहे.

मध्यंतरी महाराष्ट्रात गांज्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. एवढेच नाही तर सोलापुरातल्या एका शेतकऱ्याने गांजाची शेती करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!