ACE Tractors : ‘ऐस डीआय 854 एनजी’ छोट्या शेतकऱ्यांचा मोठा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्टये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील काही भागांमध्ये कधी-कधी शेतकऱ्यांना ना मोठ्या ट्रॅक्टरची (ACE Tractors) ना खूप छोट्या गरज असते. अर्थात अशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र हे लहान शेतकऱ्यांमध्येच मोडते. मात्र, त्यांना मध्यम शेतीसाठीचा ट्रॅक्टर हवा असतो. आता तुम्ही देखील असा मध्यम क्षमतेचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर देशातील नामांकित ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘ऐस’ने तुमच्यासाठी ACE DI 854 NG हा एक उत्तम ट्रॅक्टर बनवला आहे. आज आपण ‘ऐस’ कंपनीच्या “ऐस डीआय 854 एनजी” या ट्रॅक्टरबद्दल (ACE Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

“ऐस डीआय 854 एनजी” ट्रॅक्टरची विशेषतः

ऐस कंपनीने आपल्या “ऐस डीआय 854 एनजी” या ट्रॅक्टरला (ACE Tractors) 2858 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये वॉटर कुलिंग सिस्टीमसह तयार करण्यात आला आहे. ऐस कंपनीचा हा ट्रॅक्टर 32 एचपी पॉवरसह 155 एनएम टॉर्क जनरेट करतो. कंपनीने या ट्रॅक्टरला ड्राय एअर क्लिनर विथ कुलिंग सेन्सर टाइप एयर फिल्टर दिलेला आहे. कंपनीच्या या “ऐस डीआय 854 एनजी” ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पावर ही 27.2 एचपी इतकी आहे. जी इंजिनच्या माध्यमातून 1800 आरपीएमची निर्मिती करते. ऐस कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 3650 MM लांबी आणि 1700 MM रूंदीसह 1960 MM व्हीलबेसमध्ये तयार केले आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 395 MM ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर फ्यूल एफिशिएंट टेक्नोलॉजीसह येतो. ज्यामुळे तो कमी इंधनात अधिक काम करतो.

काय आहेत वैशिष्ट्ये? (ACE Tractors ACE DI 854 NG)

  • स्टीयरिंग – मेकॅनिकल स्टीयरिंग
  • गियरबॉक्स – पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर
  • क्लच – ड्राय टाईप सिंगल
  • ट्रांसमिशन – कॉन्स्टंट मेश
  • पुढील बाजूचा वेग – 2.29 ते 27.75 किमी प्रति तास
  • मागील बाजूचा वेग – 2.86 ते 11.31 किमी प्रति तास
  • डिझेल टाकी – 57 लीटर क्षमता
  • वजन उचलण्याची क्षमता – 1200 किलो
  • ट्रॅक्टरचे एकूण वजन – 1920 किलो
  • ब्रेक्स – ड्राय डिस्क ब्रेक्स आणि ऑइल इमर्जड ब्रेक्स
  • पावर टेकऑफ – 6 स्प्लिन
  • पुढील टायर – 6.00 X 16 आकारात
  • मागील टायर – 12.4 X 28 आकारत

किती आहे किंमत?
ऐस कंपनीने आपल्या “ऐस डीआय 854 एनजी” या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 5.10 लाख ते 5.45 लाख इतकी निर्धारित केली आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरला 2000 तास किंवा मग 2 वर्ष जे आधी पूर्ण होईल. तितक्या क्षमतेत वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!