एक शेळी विकून तरुण झाला मालामाल! 1 लाखाचा भाव मिळालेल्या शेळीत काय विशेष?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करतात. नाशिक इथल्या एका तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दक्षिण आफ्रिकेतील ‘बोअर’जातीच्या शेळ्यांच्या शास्त्रशुद्धपणे पालन केले आहे. नुकतेच त्यांच्या चार शेळ्यांची विक्री झाली आहे. त्यातून त्यांना 4 लाख 44 हजार रुपये मिळाले आहेत. सर्वत्र सध्या त्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी तालुका येथील बापू बर्वे हे औषध निर्माण उद्योगात गेल्या 14 वर्षांपासून नोकरी करतात. नोकरीला कृषी पूरक व्यवसायाची जोड असावी या उद्देशाने 2016 पासून त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला उस्मानाबादी, शिरोही व कोटा या प्रजातीचे त्यांनी पालन केले. तर गेल्या दोन वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतील मूळ अधिवास असलेल्या’बोअर ‘जातींच्या शेळ्या ते पालन करत आहेत. शास्त्रशुद्ध व निरोगी वंशावळ चारापाणी व आरोग्याचे चोख व्यवस्थापन व सोशल मीडियाद्वारे करत असलेल्या प्रभावी मार्केटिंग यामुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘बोअर ‘जातीच्या शेळ्यांमध्ये प्रजनन पश्चात योग्य संगोपन केल्याने प्रति महिन्याला सहा ते सात किलो वजन वाढ होते. त्यामुळे त्यांच्याकडील शेळ्यांना मागणी येत आहे. त्यांच्याकडील चार शेळ्यांना नगर व जालना जिल्ह्यातील शेळीपालक यांनी 1 लाख अकरा रुपयांप्रमाणे शेळ्यांची खरेदी केली आहे. पैदास कार्यक्रमात प्रजननासाठी मागणी असल्यानं त्याची ही विक्री झाल्याचे बर्वे यांनी सांगितलं.

गेल्या पाच वर्षांपासून बर्वे हे शेळीपालनात सक्रिय असून शास्त्रीय पद्धतीने कामकाज करतात कामकाजा निमित्त परदेशी दौरे करताना त्यांनी शेळी पालन व्यवसायाला भेटी देत कामकाज समजून घेतलं. त्यामुळे या व्यवसायात त्यांनी नाविन्यपूर्ण आणली आहे शेळीपालन करताना पशुंचे आजार आहार संगोपन आणि विपणन या बाबींचा अभ्यास करून ‘लकी गोट फार्म’ नावाने व्यवसाय त्यांनी विस्तारला आहे.