Agri Business : भन्नाट आयडिया! केळीच्या देठांपासून करा ‘हा’ व्यवसाय; होईल मोठी उलाढाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agri Business) वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी फळपिकांची लागवड करून मोठी कमाई करत आहेत. आता तुम्हीही केळी लागवडीतून मोठी कमाई करण्यासह, केळीच्या उरलेल्या अवशेषांपासून कशा पद्धतीने जैविक खते तयार करू शकता. आणि त्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्चात कपात करण्यासह कसा छोटासा व्यवसाय (Agri Business) करू शकता. तसेच तुमच्या परिसरातील केळी लागवड करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनाही याचा कसा फायदा होईल. याबाबत थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत.

राज्यातील अनेक भागांमध्ये केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातच नाही तर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी राज्यातील कोणत्याही भागामध्ये केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना (Agri Business) दिसून येत आहे. मात्र काही शेतकरी केळीचे उरलेले अवशेष बेकार समजून तसेच शेतात सोडून देतात. ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनालाही धोका निर्माण होतो. मात्र, अशाच उरलेल्या केळीच्या अवशेषांपासून तुम्ही जैविक खाद निर्मिती करण्याचा छोटासा व्यवसाय सुरु शकतात. ज्या माध्यमातून तुमचा उत्पादन खर्च कमी होऊन, तुम्हाला कमाईचे एक साधनही मिळेल. तसेच तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यातून दोन पैसे मिळतील. चला तर जाणून घेऊया केळीच्या उरलेल्या देठांपासून, फाद्यांपासून कशी जैविक खाद निर्मिती करू शकतात.

सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन (Agri Business From Banana Stalks)

केळीच्या उरलेल्या अवशेषांपासून खाद निर्मिती करण्याचा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला जागेची गरज असणार आहे. ज्यात तुम्ही गरजेनुसार खड्डे खोदु शकता. या खड्यांमध्ये केळीचे सर्व अवशेष फांद्या, मोठी देठ यामध्ये टाकून त्यावर शेण आणि शेतातील गवत टाकू शकतात. त्यांनतर यावर तुम्हाला डिकंपोजरची (decomposer) फवारणी करावी लागणार आहे. असे केल्यानंतर काही दिवसांनंतर तुम्हाला या केळीच्या अवशेषांपासून खत मिळू शकणार आहे. त्यातून मिळणारे खत विक्री करून, छानसा व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. ज्यातून केली उत्पादक शेतकरी आणि तुम्हालाही चांगला नफा मिळेल. केंद्र सरकारकडून शेतीतील अवशेषांपासून जैविक खाद निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे.

केळीचे अन्य उपयोग

केळीच्‍या 86 टक्‍केहून अधिक उपयोग खाण्‍याकरीता होतो. तर पिकलेली केळी उत्‍तम पौष्टिक खाद्य असून, केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्‍बा, टॉफी, जेली इत्‍यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्‍या पानाचा उपयोग आच्‍छादनासाठी करतात. केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्‍हणून उपयोगात आणतात. केळीच्‍या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्‍ह म्‍हणून उपयोग केला जातो. सेंद्रिय खताच्या व्यवसाया व्यतिरिक्त केळीच्या सुकलेल्या देठातील तंतू काढून त्याचा वापर जाळीदार वस्तू, टोपली बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

error: Content is protected !!