Agri Business : वराहपालनातून तरुणाची लाखोंची कमाई; पहा.. भांडवलासह कसे केले नियोजन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा (Agri Business) म्हणून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय याशिवाय अन्य व्यवसाय करत असतात. ज्यातून शेतकऱ्यांना शेतीसोबतच दुहेरी उत्पन्न मिळत असते. वराहपालन हा देखील त्यापैकीच एक जोडधंदा असून, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाते. याच वराहपालन व्यवसायातून (Agri Business) उत्तरप्रदेशातील रायबरेली येथील एक तरुण शेतकरी वार्षिक लाखोंची कमाई करत आहे.

कुलदीप कुमार असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो रायबरेली जिल्ह्यातील कुंभी गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे या तरुणाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रोजंदारीने काम करावे लागत होते. मात्र, आज या तरुणाने वराहपालनातून (Agri Business) आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली असून, गावातील तरुणांसाठी तो रोल मॉडेल ठरला आहे. त्याच्या या वराहपालन व्यवसायाची सर्वदूर चर्चा होत आहे. आज आपण या तरुण शेतकऱ्याच्या यशस्वी वराहपालन व्यवसायाबाबत जाणुन घेणार आहोत…

रोजंदारीवर काढले दिवस (Agri Business Pig Farming Plan)

ते म्हणतात ना कोणाचे नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. रायबरेली येथील कुलदीप कुमार या तरुण शेतकऱ्यासोबत देखील असेच काही घडले आहे. कुलदीप कुमार सांगतो, “कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. शिक्षण तर दूरच पण दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होती. अनेक दिवस शेतीसोबत रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. अशातच कुलदीप कुमार यांनी पशुपालन व्यवसायात उतरण्याचे मनोमन ठरवले. त्यानुसार माहिती व्यवसायाबद्दल माहिती मिळवत असतानाच त्यांना वराहपालनाबाबत माहिती मिळाली. अधिकची माहिती घेऊन त्यांनी वराहपालन व्यवसाय केला. आज ते या व्यवसायातून वार्षिक लाखोंची कमाई करत आहे.

कमी खर्चात जास्त नफा

कुलदीप कुमार सांगतो, वराहपालन व्यवसाय (Agri Business) सुरु करण्यासाठी आपल्याकडे सुरुवातीला कमीत कमी 60 ते 80 रुपयांचे भांडवल असणे आवश्यक असते. ज्यातून आपल्याला व्यवसाय सुरु केल्यानंतर सध्या वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. डुक्कर एका वेळी अनेक पिल्लांना जन्म देतात. त्यांच्या देखभालीकडे पोल्ट्री व्यवसायाप्रमाणे इतके विशेष लक्ष देण्याचीही गरज नसते. डुक्करांना शक्यतो कोणतेही आजार होत नाही. मात्र, आपण खबरदारी म्हणून आणि गुणवत्तापूर्ण मांस उत्पादनासाठी आपल्याकडील सर्व डुकरांची नियमित तपासणी करतो. डुकरांना एक तोंडाचा रोग सोडला तर अन्य कोणतेही रोग होत नाहीत. या तोंडाच्या रोगाचे आपण नियमित लसीकरण करतो. त्यामुळे आपल्या शेडमध्ये त्याच्या आपण शिरकाव होऊन देत नसल्याचे तो सांगतो.

पिल्लांची झपाट्याने उत्पत्ती

एक मादी डुक्कर 114 ते 115 दिवसांमध्ये 6 ते 7 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे कमी कालावधीत डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ज्यामुळे या व्यवसायात झपाट्याने वाढ होण्यास मदत होते. अर्थात तुमच्याकडे जितके जास्त डुक्कर उत्पत्ती होईल तितके तुमचे मांस उत्पादन वाढते. आणि त्यातून तितका अधिक फायदा या व्यवसायातून होत असतो. असे कुलदीप कुमार सांगतो. वराहपालनाकडे दुय्यम दर्जाचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. मात्र, सध्याच्या काळात तरुणांनी देशातील आणि वैश्विक मांसाची गरज लक्षात घेता या व्यवसायाचे महत्व ओळखून, कमी खर्चात अधिक नफा मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने यात उतरण्याची आवश्यकता असल्याचेही कुलदीप कुमार शेवट सांगतो.

error: Content is protected !!