Agri Business : 30 वर्ष द्राक्ष शेती, बापांना जमलं नाही; ते पोरांनी करून दाखवलं!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या गोष्टीचा पाया पक्का असेल तर त्यावर कितीही मोठे बांधकाम (Agri Business) केले जाऊ शकते. अगदी याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे या दोघा भावंडांनी आपल्या 1984 पासूनच्या काळात द्राक्ष शेतीचा डोलारा उभा केला. दुष्काळी भाग असूनही शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांनी तीस वर्षांपासून द्राक्ष शेती जपली. आणि आज 30 वर्षानंतर त्यांची मुले चेतन आणि शुभम हे याच भक्कम पायाच्या जोरावर द्राक्ष निर्यातदार बनले आहे. या दोघा भावांनी 2018 साली ‘ग्रोप्लस एक्स्पोर्ट कंपनी’ची (Agri Business) स्थापना केली आहे. त्यांची ही कंपनी 600 ते 650 टनापर्यंत द्राक्षाची निर्यात करतात.

35 एकरात द्राक्ष शेती (Agri Business Grapes Export Company)

खटाव तालुक्यातील शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांनी 1984 साली द्राक्ष शेतीची (Agri Business) सुरुवात केली. सुरुवातीला दोन एकर, चार एकर, आठ एकर अशी वाढवत वाढवत त्यांनी आज आपली द्राक्ष शेती 35 एकर जमिनीवर आणून ठेवली आहे. कायमचा दुष्काळी भाग म्हणून खटाव तालुक्याची ओळख आहे. मात्र यावरही मात करून विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांनी 12 किलोमीटरहून पाईपलाईनद्वारे पाणी आणत, स्टोरेजसाठी शेततळे उभारले. अशी सर्व व्यवस्था करून आज त्यांनी द्राक्ष शेतीत पूर्ण जम बसवला आहे.

मुलांनी उतरवले स्वप्न सत्यात

शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांना नेहमीच वाटायचे आपण द्राक्ष निर्यातदार म्हणून पुढे यावे. परंतु माहितीचा अभाव आणि शिक्षणही कमी असल्यामुळे त्यांना हे जमले नाही. मात्र त्यांनी दोघांच्याही मुलांना एकाचा मुलगा चेतन आणि दुसऱ्याचा शुभम यांना द्राक्ष निर्यातीत उतरवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी आपल्या मुलांना कृषी महाविद्यालयात शिक्षण दिले. त्यानंतर आता चेतन आणि शुभम यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर द्राक्ष निर्यातदार बनून वरुडे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. सध्याच्या घडीला दोघाही चुलत भावंडांचे उत्पन्न एक ते दीड कोटींच्या घरात असून, सातारा जिल्ह्यातील पहिले द्राक्ष निर्यातदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

अत्याधुनिक साधनांचा वापर

सध्या वरुडे यांच्याकडे 60 माणसे रोज कामाला आहेत. याशिवाय फवारणीसाठी 5 ट्रॅक्टर, पाण्याची टाकी, शेततळे, पॅकहाऊस अशा सोयी त्यांनी तयार केल्या आहेत. तर 35 एकरातील द्राक्ष शेतीला ठिबकची व्यवस्था असल्याने, त्यांना पिकांचे व्यवस्थापन करण्यात अधिक अडचण येत नाही. इतकेच नाही बदलत्या हवामानामुळे द्राक्ष पिकाला फटका बसू नये. यासाठी त्यांनी स्वतःचे वेदर स्टेशन देखील उभारले आहे. द्राक्ष निर्यातीचा माल साठवून ठेवण्यासाठी त्यांनी शेतातच कोल्ड स्टोरेज उभारले आहे. हे स्टोरेज 100 टन क्षमतेचे असून, 20 टन क्षमतेचे प्री कुलींग सुद्धा या ठिकाणी केले जाते.

error: Content is protected !!