Agri Business : विदेशातील नोकरीत मन रमेना; 50 शेतकऱ्यांच्या मदतीने उभारला मधनिर्मिती उद्योग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमालाला कधी योग्य दर मिळतो तर कधी बेभावात शेतकऱ्यांना (Agri Business) आपला माल विक्री करावा लागतो. त्यामुळे आधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती आधारित उद्योगांची वाट धरण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्हीही असाच एखादा शेतीवर आधारित बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर मधुमक्षिपालन व्यवसाय हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मधनिर्मिती करण्यासोबतच तुम्ही मधापासून निरनिराळे ब्रँड देखील तयार करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाने विदेशातील नोकरी सोडत, मधनिर्मिती उद्योगात पाय रोवत सुरु केलेल्या स्टार्टअपबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याने मधव्यवसायात (Agri Business) आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.

मधनिर्मिती उद्योगाचे स्टार्टअप (Agri Business Honey Industry)

जकी इमाम असे या मधनिर्मिती उद्योगाचे स्टार्टअप (Agri Business) सुरु करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो ओमान या देशात चांगल्या पगारावर नोकरी करत होता. मात्र विदेशात मन रमत नसल्याने त्याने आपल्या मायभूमीची वाट धरली. तो बिहारच्या पटना येथील रहिवासी असून, त्याने मायदेशी परतत आपला भाऊ फजल इमाम याच्या मदतीने मधनिर्मिती उद्योग सुरु केला आहे. या दोघा भावंडांनी आपल्या स्टार्टअपला ‘इमाम ब्रदर्स कंपनी’ असे नाव दिले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून मध व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे बिहार सरकारच्या उद्योग विभागाकडून त्यांच्या या स्टार्टअपला काही दिवसांपूर्वीच परवानगी देखील मिळाली आहे. अल्पावधीतच जकी इमाम यांच्या या कंपनीने 40 लाखांचा टर्नओवर केला आहे.

कसा चालतो व्यवसाय?

जकी इमाम यांनी आपल्या या मधनिर्मिती व्यवसायासाठी पटनासह आसपासच्या जिल्ह्यांतील जवळपास 50 शेतकऱ्यांना आपल्या सोबत जोडले आहे. या शेतकऱ्यांकडून ते मधाची खरेदी करतात. यामध्ये ते ब्लॅकबेरी, तुळस, लिची, शेवगा यांसह अन्य माध्यमातून शेतकऱ्यांकडून मधमाशीपालनातून उत्पादित होणारे मध आपल्या व्यवसायासाठी खरेदी करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनाही एक उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला असून, जकी इमाम देखील आपला व्यवसाय वृद्धिंगत करत आहेत.

स्वतःचे ब्रँड केले तयार

मधनिर्मिती उद्योगात अफाट संधी असल्याचे सांगताना जकी इमाम म्हणतात, आपण सध्या शेतकऱ्यांकडून उपलब्ध होणाऱ्या मधाच्या मदतीने आवळा मुरब्ब्यामध्ये साखर टाकण्याऐवजी मध टाकत आपला एक विशिष्ट ब्रँड तयार केला आहे. यासोबतच मध आणि हळद यांच्या विशिष्ट प्रमाणातून आपण मधाचे हर्बल प्रॉडक्टची देखील निर्मिती केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने लोक जागरूक झाल्याने आपल्या या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी मिळत आहे. असेही जकी इमाम यांनी म्हटले आहे.

याशिवाय त्यांनी मधनिर्मिती उद्योगाच्या माध्यमातून पाच लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले असून, अनेक शेतकऱ्यांना देखील त्यांच्यामुळे अर्थार्जनाचा एक मार्ग मिळाला आहे. आपल्या मधनिर्मिती उद्योगाची नोंद सरकार दरबारी झाली असून, सध्या प्राथमिक स्तरावर असलेला हा उद्योग भविष्यात आपल्याला खूप पुढे घेऊन जायचा आहे. आपल्यासोबतच मधुमक्षिकापालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल याचसाठी आपण या स्टार्टअपची सुरुवात केल्याचे जकी इमाम यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!