Agri Business : तुम्हीही बांबूच्या ‘या’ वस्तू बनवू शकता; तरुणाने उभारलंय बिझनेस मॉडेल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना बांबू शेती (Agri Business) करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेतीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र बांबू शेती करण्यासोबतच तुम्ही बांबू आधारित स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. ज्याद्वारे तुम्हाला मोठी कमाई होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका अशा तरुणाबद्दल सांगणार आहोत. ज्याने बांबूपासून रोजच्या वापरातील निरनिराळ्या वस्तू बनवून, आपला स्वतःचा एक स्टार्टअप व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायातून (Agri Business), या तरुणाने वर्षभरातच 20 लाखांची कमाई केली आहे.

ऋषभ कुमार असे या तरुणाचे नाव असून, तो बिहार या राज्यातील आहे. त्याने आपला मित्र विश्वजित कुमारसोबत हा बांबूपासून वस्तू निर्माण करण्याचा व्यवसाय (Agri Business) सुरु केला आहे. ऋषभ कुमारने अर्थशास्रात तर विश्वजित कुमारने इंजिनिअरिंग क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतले आहे. या दोघांनी बांबू पासून रोजच्या वापरातील वस्तू बनवत, बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सध्या बिहारच्या बाजारपेठांमध्ये या दोघांच्या वस्तूंची मोठी चर्चा होत आहे. ऋषभ कुमार याने आपली वार्षिक 11 लाखांची नोकरी सोडून, या व्यवसायात पदार्पण केले आहे.

कोणत्या वस्तूंची निर्मिती? (Agri Business Making Items From Bamboo)

ऋषभ आणि त्याचा मित्र विश्वजित कुमार 2022 पासून या व्यवसायात उतरले आहे. अशीच चर्चेदरम्यान पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यासाठी बांबूची योग्य उपयोग होऊ शकतो. अशी कलपना त्या दोघांना सुचली. त्यानुसार त्यांनी बांबूपासून रोजच्या वापरातील स्टार्टअप सुरु करण्याचे ठरवले. सध्या ते दोघेही आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून बांबूपासून बनवलेल्या टूथब्रश, पाण्याच्या बाटल्या, डायरी, पेन्सिल आदी वस्तू बनवत आहेत. विशेष म्हणजे लोकांना पर्यावरणाकडे बघण्याचा द्रीष्टीकोन बदलल्याने त्यांच्या बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना बाजारात विशेष मागणी देखील आहे.

केळीपासूनही वस्तूंची निर्मिती

याशिवाय ऋषभ आणि विश्वजित यांनी केळीपासून बनवलेली देखील अनेक प्रकारची उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी या दोघांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मदत घेतली असून, ते बांबू आणि केळीशी संबंधित उत्पादने तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करत आहे. विशेष म्हणजे ऋषभने एक उपक्रम हाती घेतला असून, तो पेन्सिलची निर्मिती करताना त्यावर मागील टोकाला फळांच्या बिया घट्ट बसवतो. जेणेकरून, पेन्सिल संपल्यानंतर ती इतरत्र फेकल्यास त्यापासून वृक्ष लागवडीस मदत होते.

error: Content is protected !!