Agri Business : भाजीपाला, फळशेतीला मासेपालनाची जोड, शेतकऱ्याची वार्षिक 10 लाखांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Agri Business) पाउल ठेवत आहे. इतकेच नाही तर आधुनिक पद्धती व तंत्रज्ञान यांचा वापर करत, शेतीमध्ये मोठे आर्थिक यश देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या शेतीतील यशाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यासह, केळी, आंबा, पेरू आणि बोर पिकाच्या शेतीतुन आर्थिक प्रगती साधली आहे. याशिवाय मासेपालन व्यवसायातून देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्थात भाजीपाला, फळशेती व मासेपालन अशा सर्व एकात्मिक शेतीतून (Agri Business) तो वार्षिक 10 लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत.

फळबाग शेतीची धरली कास (Agri Business Integrated Farming)

हिरोद पटेल असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो ओडिसा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यातील रतनपुर येथील रहिवासी आहे. हिरोद याने आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले असून, वडिलांच्या नोकरीतील निवृत्तीनंतर, हिरोद याने शेती व्यवसायामध्ये स्वतःला पूर्णतः झोकून दिले. सध्या त्याने आपल्या शेतीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड केली असून, तो केळी, आंबा, पेरू आणि बोर या फळांची देखील शेती करत आहे. ज्यामुळे त्याला वार्षिक एकत्रितपणे 10 लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे तो सांगतो.

मिळवतोय 10 पट अधिक उत्पन्न

हिरोद पटेल सांगतो, आपण आयटीआयपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रामुख्याने नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपल्याला वडिलांची खूप मदत झाली. आपण आधुनिक शेतीमध्ये असलेले बारकावे समजून सध्या हंगामी भाजीपाला लागवड, फळबाग शेती करतो आहे. आपल्या परिसरातील शेतकरी पारंपारीक पद्धतीने धान शेती करतात. मात्र, त्यापासून एकरी वार्षिक उत्पन्न जवळपास 10 पटीने (25 ते 30 हजार) कमी मिळते. मात्र आधुनिक भाजीपाला आणि फळबाग केल्यास त्याच ठिकाणी एकरी 2 ते 2.5 लाख रुपये अधिकचे उत्पन्न मिळते, असे तो सांगतो.

शेतीला मासेपालनाची जोड

हिरोद यांनी फळबाग आणि भाजीपाला शेतीसोबत मासेपालन व्यवसाय (Agri Business) देखील सुरु केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या शेतीमध्ये तीन तलाव तयार केले आहेत. ज्यांच्या मदतीने ते मासेपालन करतात. याशिवाय या तलावांचा उपयोग शेतीसाठी पाणी म्हणूनही उपयोग होत असल्याचे ते सांगतात. अर्थात एकात्मिक शेतीचे आपण सर्वोत्तम उदाहरण आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना घालून दिले असल्याचे ते सांगतात. त्यांनी आपल्या या एकात्मिक शेतीच्या माध्यमातून आपल्या परिसरातील काही तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असल्याचे ते सांगतात. दरम्यान, अलीकडेच आपण आधुनिक शेतीसाठीची मॉडेल पाहण्यासाठी, राज्य सरकारमार्फत केळी पिकाची सविस्तर माहिती पाहून आल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे.

error: Content is protected !!