हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात केळीचे उत्पादन (Agri Business) घेतले जाते. केळी या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जेव्हा झाडांची तोडणी केली जाते. तेव्हा शेतकरी ही केळीची झाडे किंवा अवशेष खराब असल्याचे समजून उकिरड्यावर फेकून देतात. मात्र आता याच केळीच्या झाडाच्या खोडांचा उपयोग करून तुम्ही दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. ज्याद्वारे केळीचे उत्पादन घेण्यासह शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही आपल्या भागात केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून ही झाडे विकत घेऊन, हा छानसा व्यवसाय (Agri Business) सुरु करू शकतात. चला तर जाणून घेऊ ‘या’ व्यवसायाबद्दल…
कशी होते सूतनिर्मिती? (Agri Business From Banana Trunk)
केळीचे झाड हे फायबरचा खूप मोठा स्रोत आहे. परिणामी केळीच्या झाडापासून अनेक पर्यावरणपूरक वस्तू बनवल्या (Agri Business) जाऊ शकतात. या गोष्टींबाबत अनेकांना बहुधा माहिती नसते. केळीच्या झाडाची साल आणि खोडापासून धागे काढले जातात. हे धागे काढण्यासाठी विविध पद्धती व तंत्रांचा वापर केला जातो. या धाग्यांमधून ओलसरपणा कमी करण्यासाठी ते वाळवले जातात. धागे सुखवण्याची प्रक्रिया उन्हात किंवा मशीनच्या मदतीने देखील केली जाऊ शकते. त्यानंतर हे धागे साफ केले जातात. हे धागे मोठा ब्रश किंवा कंगाव्याच्या माध्यमातून साफ केले जातात. या धाग्यांना पारंपरिक पद्धतीने यंत्रमागाप्रमाणे किंवा मशीनच्या मदतीने सुतामध्ये रूपांतरित केले जातात.
काय प्रक्रिया केल्या जातात
सूत बनवण्याच्या या प्रक्रियेनंतर, त्यास चांगल्या पद्धतीने विणले जाते. ज्याच्या वापर करून तुम्ही अनेक उत्पादने बनवू शकतात. या मिळालेल्या सुताला रंगवले जाते. यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक आणि कृत्रिम रंगाच्या मदतीने हे सूत रंगवले जातात. त्यानंतर रंगवलेल्या सुताला पुन्हा वाळवून इस्त्री केली जाते (पाण्यापासून खराब होऊ नये म्हणून). अशा प्रक्रियांचा समावेश करत अंतिम रूप दिले जाते. आजपर्यंत केळीच्या बनवलेल्या सुतापासून कापडनिर्मिती करणे किंवा मग केळीच्या झाडांच्या खोडापासून तसेच अवशेषांपासून जैविक खतनिर्मिती केली जाते हे पाहिले आहे. मात्र या केळीच्या झाडाच्या खोडापासून फायबर मिळवत, त्यापासून तयार केलेल्या सुतापासून अनेक वस्तू देखील बनवल्या जाऊ शकतात.
ही आहे वस्तूंची यादी
- आकर्षक कपडे बनवले जातात. ज्यांना बाजारात खूप मागणी असते.
- याशिवाय घरगुती वस्त्र बनवले जातात.
- घरगुती उपयोगातील पर्यावरणपूरक पिशव्या तयार केल्या जातात.
- टोपल्या, चटई आणि गृह सजावटीच्या अनेक वस्तू तयार केल्या जातात.
- इतकेच नाही तर केळीच्या सुतापासून कागद निर्मिती, स्टेशनरी उत्पादने देखील तयार केले जातात.
- या फायबरच्या सुताच्या उपयोग चऱ्हाट, दोऱ्या, सुतळी बनवण्याच्या उद्योगात देखील केला जातो.