Agri Business : केळीच्या देठापासून कापड निर्मिती; तुम्हीही करू शकता ‘हा’ भन्नाट व्यवसाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आतापर्यंत आपण केळीच्या झाडाचा अनेक पद्धतीने (Agri Business) उपयोग होत असल्याचे ऐकले आहे. केळी आणि तिच्या संपूर्ण देठाचा उपयोग हा विविध माध्यमातून केला जातो. मात्र आता केळीच्या देठापासून बनवलेल्या धाग्यांना भविष्यात फॅशन जगतात मोठी मागणी राहू शकते. त्यामुळे तुम्हीही हा नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण केळीच्या देठापासून होणाऱ्या धाग्यांच्या निर्मितीबाबत (Agri Business) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

केळीच्या देठापासून तयार होणाऱ्या धाग्यांपासून कापडनिर्मिती (Agri Business) केली जाते. फॅशन जगतात अशा कपड्यांना मोठी मागणी असते. ज्या केळीच्या झाडाचा उपयोग आतापर्यंत केवळ फळ निर्मितीसाठी होत होता. त्याच केळीच्या झाडापासून आता तुम्हीही ब्रँडेड कपड्याचे धागे बनवू शकतात. केळीच्या देठाच्या या प्रभावी वापरामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही केळीच्या देठापासून धाग्यांची निर्मिती करू शकतात.

जागतिक पातळीवर मोठी मागणी

केळीचे देठ आणि साल यामध्ये प्राकृतिकरित्या फायबर (Agri Business) आढळते. या फायबरचा उपयोग दागिने आणि कपडे तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील अर्थार्जनाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. केळीच्या धाग्यांपासून बनवलेल्या कपड्यांना जागतिक पातळीवर मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (एनआरसीबी) याबाबत अधिक संशोधन करत आहे. यासाठी एनआरसीबीने मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेसोबत करार केला आहे. या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळण्याची आहे. केळीच्या तंतूंमध्ये हानी करणार नाही असे रसायने मिसळून लांब आणि मजबूत तंतू तयार करण्याचे काम या संस्थांकडून सुरू आहे. त्यामुळे हा व्यवसाय चांगलाच नावारूपाला येऊ शकतो.

या’ भागात सुरुवात

सध्यस्थितीत देशातील रेशीम उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारच्या भागलपूर शहरात केळीच्या देठापासून धाग्यांची निर्मिती केली जात आहे. अशा पद्धतीने तयार केलेल्या कपड्यांना केनिया आणि नायजेरियन लोकांकडून मोठी मागणी असते. देशात पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हैद्राबाद या शहरांमध्ये देखील या कपड्यांना मोठी मागणी आहे. हबीबपूर, हुसेनाबाद, शहाजंगी, बदरपूर, पुरैनी या शहरांमध्ये जवळपास 50 हून अधिक विणकर हातमागावर केळीपासून निर्मिती केलेल्या फायबरच्या धाग्यापासून कपडे तयार करत आहेत. यामध्ये पाचशेहून अधिक महिलांचाही सहभाग असून, त्या तंतू कापून धागे तयार करतात.

केळीच्या धाग्यांची वैशिष्ट्ये (Agri Business Textiles From Banana Stalks)

  • रेशीमच्या धाग्यासारखे मुलायम असते.
  • बाहेरील भाग हा कापसारखा खडबडीत असतो.
  • आतील भाग देखील खडबडीत असतो.
  • रेशीमपेक्षाही केळीपासून निर्माण केलेल्या धाग्यांची किंमत अधिक असते.

कसे बनते कापड?

सर्वप्रथम केळीची साल आणि देठापासून धागे काढले जातात. हे धागे काढण्यासाठी विविध पद्धती व तंत्रांचा वापर केला जातो. ज्यामध्ये धाग्यांना नरम करण्यासाठी आणि वेगळे करण्यासाठी केळीच्या सालींना पाणी आणि काही रासायनिक पदार्थांमध्ये भिजवले जाते. केळीच्या अनुपयोगी भागाला काढून टाकले जाते. ओले असल्यास वेगवेगळे करणे अवघड जात असल्याने मिळालेले धागे वाळवले जातात.

त्यानंतर हे वाळलेले धागे गुणवत्तेच्या आधारावर विलग केले जातात. ‘अ’ गुणवत्तेच्या धाग्यांना सर्वश्रेष्ठ धागे म्हणून ओळखले जाते. त्यांचा उपयोग हा रेशमला पर्यायी म्हणून केला जातो. अशा गुणवत्तेच्या आधारावर धाग्यांचे वर्गीकरण करून निर्मिती केली जाते. या धाग्यांना पुढे सुतामध्ये रुपांतरीत केले जाते. धाग्यांना रंगरंगोटी करत त्यापासून कापडनिर्मिती केली जाते.

error: Content is protected !!