Agri Business : शेती फुलली, कमाई देखील झाली; गांडूळ खतातून महिला शेतकऱ्याने साधली प्रगती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नवयुवक तरुणच नाही तर महिला देखील शेती व्यवसायामध्ये (Agri Business) आपापल्या परीने प्रयोग करत प्रगतीची वाटचाल सोपी करत आहेत. ‘चूल आणि मुलं’ या उक्तीला मूठमाती देत आज महिला शेती क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेताना दिसून येत आहे. जेव्हा एखादी महिला एखाद्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवते, तेव्हा ती त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठत स्वतःसह कुटुंबाचा विकास घडवून आणते हे आजवर आपण बघत आलोय. अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प (Agri Business) उभारून आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.

नावीन्यतेचा ध्यास (Agri Business Of Women Farmer)

शेतकरी सुवर्णा भगवान पाटील (Agri Business) असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावच्या रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबाची 2.5 एकर शेती असून, त्या ऊस हे बारमाही पीक घेत होत्या. त्यातून कुटुंब चालवताना ओढाताण होत असल्याने सुवर्णा या पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी शेतीत काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात बाळगून होत्या. त्यासाठी त्या शेतीमध्ये नेहमीच नाविन्यता आणत होता. मात्र एका पिकावर अवलंबून राहणे शेतकऱ्याला जमत नाही. अशातच त्यांच्या इच्छाशक्तीला पाठबळ मिळण्यासाठी त्या आपल्या गावामध्ये आयोजित एका ‘माती आरोग्‍य सुधारणा’ प्रशिक्षणामध्‍ये सहभागी झाल्या होत्या. आणि तिथूनच त्यांच्या शेतीतील यशाचा मार्ग सुखकर होण्यास मदत झाली.

कसा निवडला मार्ग?

शेतकरी सुवर्णा या आपल्या ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत होत्या. मात्र गावात आयोजित प्रशिक्षणादरम्यान त्यांना गांडूळ खताचे महत्व समजले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपण आपल्या शेतीची सुपीकता वाढवत, मोठ्या प्रमाणात गांढूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभारू शकतो. त्याचक्षणी त्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे ठरवले. ज्यामुळे त्यांचा खतांवरील होणारा उत्पादन खर्च पूर्णतः कमी झाला आहे. याशिवाय जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत झाली आहे.

इतर शेतकऱ्यांनाही विक्री

गावात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना वर्मी कंपोस्‍ट खत (Agri Business) तयार करण्यासाठीचे बेड मिळाले. याशिवाय तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळाले. त्यानुसार त्यांनी आपल्या शेताला लागूनच हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून, एका बेडच्या माध्यमातून त्यांना 450 किलो गांडूळ खत निर्मिती करता आली आहे. असे आत्तापर्यंत त्यांनी गांडूळ निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून 3200 किलोपेक्षा अधिक गांडूळ खत तयार केले आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु करून, त्यांना अजून एक वर्षही झालेले नाही. हे गांढूळ खत त्या आपल्या ऊस पिकाला वापरत आहे. तसेच अतिरिक्त गांडूळ खत त्या गावातील इतर शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. त्यामुळे त्यांना उसाच्या उत्पादन खर्चात बचत होण्यासह अतिरिक्त कमाई देखील होत आहे.

व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न

शेतकरी सुवर्णा भगवान पाटील यांना आतापर्यंत मिळालेल्या यशानंतर त्यांनी आपला गांडूळ खत निर्मितीचा मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत करण्याचे निश्चित केले आहे. सुवर्णा या गावात आणि आसपासच्या शेतकऱ्यांसाठी आदर्श बनल्या असून, त्या गावातील शेतकऱ्यांना देखील गांडूळ खत निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन करत आहे. याद्वारे त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होत आहे.

error: Content is protected !!