Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, आपल्या पतीच्या मदतीने ‘बकरी बँक’ चालवत आहे. ‘बकरी बँक’ हे नाव ऐकून तुम्ही विचारात पडला असाल? मात्र या बँकेत पैशांचा नाही तर शेळयांच्या देवाण-घेवाणीचा (Agri Business) व्यवहार चालतो. आज आपण या बँकेच्या कार्यप्रणालीबाबत जाणून घेणार आहोत.

काय आहे बकरी बँक? (Agri Business Woman Starts Goat Bank)

जयंती महापात्रा असे या महिलेचे नाव असून, त्या आपल्या पती बीरेन साहू यांच्यासह बंगळुरूमध्ये दशकभरापूर्वी चांगल्या पगाराची (Agri Business) नोकरी करत होत्या. दोघांनाही चांगले पॅकेज होते. मात्र शेतीची ओढ असल्याने, त्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली. दशकभरापूर्वी त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून कालाहांडी जिल्ह्यात आपल्या सालेभाटा या मूळ गावी एक बॅंकरी बँक सुरु केली. या बकरी बँकेने मागील दहा वर्षात त्यांच्या आसपासच्या ग्रामीण भागात ‘अमुलाग्र’ आणि ‘क्रांतीकारी’ बदल घडवून आणला आहे. या बँकेत कोणताही पैशांचा व्यवहार होत नाही. तर शेळयांची देवाणघेवाण केली जाते.

कसा चालतो व्यवहार?

जयंती महापात्रा या आपल्या ‘मानिकस्टु एग्रो’ स्टार्टअपबाबत बोलताना सांगतात, शेळीपालनासाठी ज्या शेतकऱ्यांकडे आर्थिक भांडवल नसेल, अशा गरजू शेतकऱ्यांना बकरी बँकेकडून दोन शेळ्या दिल्या जातात. ज्यांचे वय हे साधारणपणे एक वर्षांच्या आसपास असते. शेळी ही जन्मल्यानंतर वर्षभरात पिल्ले देण्यास सुरुवात करते. त्यामुळे वाटप केलेल्या अशा शेळ्यांनी पिल्लांना जन्म दिल्यानंतर, त्यातील 50 टक्के पिल्ले ही योग्य वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत जमा करावी लागतात. या तत्वावर ही बकरी बँक कार्य करते.

40 गावांसोबत कनेक्ट

जयंती यांच्या या बँकेमुळे त्यांच्या आसपासच्या ४० गावातील जवळपास 1000 हुन अधिक लोकांना शेळीपालनातून रोजगार मिळाला आहे. जयंती या ‘मानिकस्टु एग्रो’च्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रातील फलटण येथील निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शेळीपालन संशोधकांसोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या या बकरी बँकेमध्ये सध्या जवळपास 500 शेळ्या आहेत. यात शेतकऱ्यांमध्ये वाटप केलेल्या बकऱ्यांची संख्या वेगळी आहे.

नियमित तपासणी-लसीकरण

जयंती यांच्या बकरी बँकेसोबत 40 पशुचिकित्सक जोडले गेले आहेत. यात 27 महिला आणि काही नवशिक्षित मुले आहेत. हे सर्व 40 लोक ‘मानिकस्टु एग्रो’च्या माध्यमातून बकरी बँकेसोबत जोडलया गेलेल्या शेतकऱ्यांकडील बकऱ्यांची नियमित तपासणी, लसीकरण यांसारखी सेवा पुरवतात. याशिवाय जयंती आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून शेळ्यांचे लेंडी खत, दूध, दही यांच्या विक्रीतूनही उत्पन्न मिळवतात. जे राज्यातील अनेक भागांमध्ये विकली जातात. जयंती यांच्या शेळी प्रजननातील या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘ओडिशा स्त्री शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

error: Content is protected !!