Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

आयातीचाही विचार नाही (Agri Export There Are No Plans To lift)

देशात मे 2022 पासून गहू, जुलै 2023 पासून तांदूळ आणि ऑक्टोबर 2023 पासून साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील वाढती महागाई नियत्रंणात ठेवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी हे निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. गहू, तांदूळ, साखर यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत आटा’ आणि भारत डाळ ग्राहकांना स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून दिली आहे. या वस्तूंवरील निर्यातबंदी कायम ठेवताना, त्यांची आयात करण्याबाबतही सरकारचा कोणताही विचार नसल्याचे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

ग्राहकांची मनधरणी

यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने गहू, तांदूळ आणि ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे मैदा, तांदूळ, साखर महाग होत आहे. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत या वस्तूंची उपलब्धता वाढावी. ग्राहकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागू नये म्हणून या वस्तूंची निर्यात तातडीने बंद केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन, शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसत आहे.

केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीसाठी बंदी घातलेली असली तरी नेपाळ, इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबिया या देशांना मोठ्या प्रमाणात तांदूळ पुरवला आहे. गहू, तांदूळ आणि साखर या वस्तूंवरील निर्यातबंदी उठवल्यास त्यांच्या दरात वाढ होऊ शकते. याशिवाय केंद्र सरकार सध्या 19 ते 23 रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहे. निर्यातबंदीनंतर कांदा दर चालू हंगामातील निच्चांकीवर पातळीवर पोहोचले आहेत.

error: Content is protected !!