Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे.

भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri Export)मर्यादित केली. या निर्बंधांमुळे यावर्षी सुमारे 4 ते 5 अब्ज डॉलर्सची कमतरता होण्याची शक्यता रॉयटर्स मार्फत गेल्या महिन्यात नोंदवली होती. परंतु निर्बंध असूनही भारताच्या यावर्षीच्या कृषी निर्यातीत $53 अब्ज डॉलर वाढीची अपेक्षा आहे. असे देशाचे व्यापार मंत्री यांनी सोमवारी सांगीतले.

“आम्ही 2022-23 या वर्षामध्ये सुमारे $53 अब्ज डॉलर्सची कृषी निर्यात केली होती आणि आम्हाला तांदूळ, गहू किंवा साखरेच्या निर्यातीवर निर्बंध असतानाही चालू वर्षात ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे,” असे व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या परिषदेत सांगीतले.

राज्य-संचालित व्यापार संस्था APEDA च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मांस आणि दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये आणि फळे आणि भाज्यांची निर्यात (Agri Export) वाढली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

error: Content is protected !!