Agri Minister : अर्जुन मुंडा देशाचे नवे कृषीमंत्री; नरेंद्र सिंह तोमर यांचा राजीनामा स्वीकारला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर बुधवारी (ता.6) केंद्रीय कृषी मंत्री (Agri Minister) नरेंद्र सिंह तोमर यांनी संसद सदस्यत्वासह कृषी मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तोमर (Agri Minister) यांचा राजीनामा स्वीकारला असून, नरेंद्र सिंह तोमर यांच्या जागी आता कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा हे देशाचे नवीन कृषी मंत्री बनले आहेत.

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा (Agri Minister) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते सध्या केंद्र सरकारमध्ये आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहत आहेत. तर मुंडा यांच्याकडे कृषी खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्यानंतर नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सध्या आरोग्य राज्यमंत्री असलेल्या भारती प्रवीण पवार यांना आदिवासी विभागात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत अर्जुन मुंडा? (Agri Minister Appointed Arjun Munda)

अर्जुन मुंडा हे झारखंड या राज्यांचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 1995 पासून ते राजकारणात सक्रिय असून, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षातील एक इमानदार नेता म्हणून पहिले जाते. त्यांच्या याच वृत्तीमुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना केंद्राच्या राजकारणात सक्रिय प्रवेश दिला आहे. 2000 साली झारखंड राज्यांच्या निर्मितीनंतर ते राज्याचे पहिले आदिवासी मंत्री राहिले आहेत. त्यांनतर 2010 पासून झारखंडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यांनतर त्यांनी राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा काम पाहिलेले आहे.

आदिवासी विभागाचे मंत्री

सध्या मुंडा हे झारखंड राज्यातील खूंटी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2019 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये ते आदिवासी विभागाचे मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर आता कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्जुन मुंडा यांच्याकडे देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!