Agri Online App : ऑनलाईन शेतमाल विकण्यासाठी, सरकारने केली ‘या’ ॲपची निर्मिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपला प्रक्रिया केलेला माल (Agri online App) आता ऑनलाईन विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून तशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महामंडळाने ‘महाॲग्रो‘ नावाचे ऑनलाईन मार्केटिंग ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या डाळी, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची (Agri Online App) विक्री करू शकणार आहेत.

राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या या ॲपच्या (Agri Online App) माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उत्पादने किंवा कृषी निविष्ठा देखील खरेदी करता येणार आहेत. यामुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, व्यावसायिक किंवा उत्पादक यांना या ॲपचा मोठा फायदा होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून त्यांना आपली सर्व उत्पादने थेट ऑनलाईन पद्धतीने विक्री किंवा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे उत्पादक आणि शेतकऱ्यांना या ॲपचा फायदा होणार असल्याचे महामंडळाकडून सांगितले जात आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट आणि व्यावसायिक किंवा उत्पादक खरेदी-विक्रीसाठी सहभाग घेऊ शकणार आहे. असेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

ही आहेत ॲपची वैशिष्ट्ये (Agri Online App Features)

राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या या ॲपच्या (Agri Online App) माध्यमातून तुम्हाला मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा बनण्याची संधी मिळणार आहे. तसेच गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी, कार्यक्षम विपणन व्यवस्था, सुलभ व तात्काळ नोंदणी ही ॲपची वैशिष्ट्ये असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. पुणे येथील मोशी येथे सुरू असलेल्या किसान प्रदर्शनात महामंडळाकडून शेतकऱ्यांना या ॲपबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. किसान प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस असून, अजून दोन दिवस शेतकऱ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.

error: Content is protected !!