Agri Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार – मुंडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना (Agri Scheme) आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील या योजनेचा (Agri Scheme) विस्तार करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली आहे.

समन्वयातून योजनेचा विस्तार (Agri Scheme Magel Tyala Shettale Yojana)

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील (Agri Scheme) प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार बबनराव लोणीकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नाना पटोले आदींनी देखील या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी यासंदर्भांत सविस्तर आकडेवारी सादर करताना विधानसभा सभागृहाला ही माहिती दिली आहे. शेततळे योजनेस कृषी विभागाकडून मंजूरी दिली जाते. मात्र, या योजनेची अंमलबजावणी रोजगार हमी विभागामार्फत केली जाते. म्हणून या दोनही विभागांच्या समन्वयातून या योजनेचा अधिक विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

कोकण विभागात शेती, जमिनीची रचना पाहता शेततळ्यांना मिळणारी मदत व जमिनीतील फरक दूर करून शेतकरी हिताचा निर्णय घेतला जावा, असा प्रश्न आमदार भास्कर जाधव व आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला. यावर मदतीतील फरक दूर करण्यासाठी राज्य सरकारचे दोनही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी, यासाठी ही योजना राज्य सरकारकडून राबवली जात आहे.

error: Content is protected !!