Agri Schemes : ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देणार अनुदान; ‘पहा’ तुम्हाला किती मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील शेती क्षेत्रातील ड्रोन वापराबाबतच्या योजनांबाबत (Agri Schemes) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शेतीमध्ये ड्रोन वापर वाढवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, अलीकडेच सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना (Agri Schemes) जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

वैयक्तिक शेतकऱ्यांनाही अनुदान (Agri Schemes Drones Purchase Subsidy)

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी महाविद्यालयांना ड्रोन खरेदीसाठी 100 टक्के किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) एकूण ड्रोन खर्चाच्या 75 टक्के अनुदान सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना. अल्पभूधारक शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना आणि पुर्वोत्तर राज्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा 5 लाख रुपयांपर्यतचे अनुदान दिले जाणार आहे. तर देशातील अन्य शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून 40 टक्के किंवा 4 लाखांपर्यंतचे अनुदान केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ड्रोन वापराचे फायदे

उपलब्ध आकडेवारीनुसार, दरवर्षी देशातील 35 टक्के पिके ही किडी, तण आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे खराब होत असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. मात्र अशा परिस्थितीत शेतकरी पारंपरिक पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शेतातही पिकांवर प्रभावीपणे कीटकनाशकांची फवारणी होत नाही. मोठ्या प्रमाणात औषधे वाया जातात. मात्र याउलट ड्रोनने पिकांना औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचे श्रम, पाणी आणि औषधे खरेदीवरील खर्च कमी होणार आहे. ड्रोनने औषधे फवारणी केल्याने शेतकऱ्यांचा थेट औषधांसोबत संपर्क येत नाही. त्यामुळे त्यांच्या जीविताला कोणताही धोका उद्भवत नाही. इतकेच नाही तर आठ ते दहा लिटर पाण्यामध्ये एका एकराची फवारणी पूर्ण होते. असे सरकारी पातळीवरून ड्रोन वापराबाबत सांगितले जात आहे.

error: Content is protected !!