Agri Schemes : शेतकऱ्यांनो… ‘या’ योजनांसाठी मिळते 50 टक्के अनुदान; ‘पहा’ अर्ज प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बेभरवशाच्या शेतीमुळे सध्या अनके शेतकरी, जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायांकडे (Agri Schemes) वळत आहेत. शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते. त्यामुळेही शेतकरी जोडधंद्याची वाट धरत आहे. याच जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले जाते. यात प्रामुख्याने केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयां पर्यंतच्या गुंतवणुकीवर 50 टक्के अनुदान दिले जाते. ज्या माध्यमातून तुम्ही शेळीपालन, कुकुटपालन, वराहपालन यांसारख्या जोडधंद्याची (Agri Schemes) उभारणी करू शकतात.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे स्वरूप

केंद्र सरकारच्या पशुसंवर्सधन आणि दुग्धविकास मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना (Agri Schemes) राबविली जाते. या योजनेचा उद्देश, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, पशु उत्पादकता वाढविणे हा असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना एकाच छताखाली अंडी व मांस उत्पादन, शेळी पालन आणि मेंढ्या पालनातून लोकर उत्पादन करता येणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी एक हजार कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना करू शकतात. तसेच 100 ते 500 पर्यंत शेळी मेंढी गटाची स्थापना देखील केली जाऊ शकते. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून 50 ते 100 वराह गट स्थापन केला जाऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मोठी मदत होते.

कोण अर्ज करू शकतो (Agri Schemes For Farmers)

इतकेच नाही राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकरी मुरघास (सायलेज), वैरणीच्या विटा (ब्लॉक) युनिट आणि साठवणूक युनिट देखील उभारू शकतात. या सर्व गोष्टींसाठी केंद्र सरकारकडून एकूण प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. अनुदानाची मर्यादा ही वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी असते. भारतीय लघु उद्योग विकास बँके मार्फत हे अनुदान शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी थेट खात्यात जमा केले जाते. या अनुदान योजनेचा लाभ कोणताही शेतकरी, उद्योजक, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट, शेतकरी सहकारी संघटना हे सर्व घेऊ शकतात.

योजनेच्या अटी

  • प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले असणे किंवा प्रशिक्षित तज्ज्ञांना नियुक्त करणे.
  • शेळी/मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, वैरण निर्मितीबाबत अनुभव असणे.
  • बँक कर्ज मंजूरी किवा स्व-अर्थसहाय्यित प्रकल्पांमध्ये बँक हमी आवश्यक आहे.
  • उद्योग उभारणीसाठी स्वतःची जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक.
  • केवायसीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे.

कुठे कराल अर्ज

  • शेतकरी www.nim.udyamimitra.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात.
    किंवा
  • तुमच्या जवळच्या सरकारी पशु वैद्यकीय दवाखाना,
    जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग (Agri Schemes) या ठिकाणी संपर्क करावा.

संपर्कासाठी क्रमांक

  • पशुसंवर्धन विभागाच्या 1800 233 0418 क्रमांकावर संपर्क करावा.
  • अथवा www.nim.udyamimitra.in किंवा and.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
error: Content is protected !!