Agri Schemes : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत; लगेच करा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या तुषार आणि ठिबक सिंचन अनुदान योजनेचा (Agri Schemes) लाभ घेत शेती करत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही सरकारच्या या अनुदान योजनेचा लाभ घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (Agri Schemes) सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सरकारच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या (Agri Schemes) 2023-24 या वर्षासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व अन्य भू-धारकांना 45 टक्के अनुदान देण्यात दिले जाते. तर अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजनेत 35 टक्के व 45 टक्के पूरक अनुदान दिले जाते. मात्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी असल्याने, क्षेत्रीय स्तरावर या योजनेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे (Agri Schemes Deadline Till 31 December)

  • सातबारा, 8 अ उतारा.
  • आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स.
  • आधार बँक खात्यासोबत लिंक असणे बंधनकारक
  • लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी.
  • नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं-घोषणापत्र अर्जासोबत जोडावे.

अर्ज कुठे कराल?

  • अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login सरकारच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • याशिवाय शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक या अधिकऱ्यांशी संपर्क साधावा किंवा तालुक्याच्या कृषी कार्यालयाला भेट द्यावी. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जातून संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. संच बसविल्यानंतर कृषी पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होऊन, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा स्तरावरून अनुदान जमा केले जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
error: Content is protected !!