Agri Technology : कृषिमंत्री मुंडे म्हणताय… उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे कराच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर आधुनिक यंत्र (Agri Technology) आणि साधनांचा वापर करण्याची गरज आहे. तसेच शेती करताना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. जेणेकरून शेती करताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Agri Technology) विधानपरिषदेत केले आहे.

राज्य सरकारने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Agri Technology) सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी अनेक प्रश्न समोर आले. त्या प्रश्नांना उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले आहे की, सध्या शेतीमध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत क्रांती घडवावी. औषधे फवारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह ‘ड्रोन’चा वापर करण्यावर भर द्यावा. यासाठी केंद्र सरकारकडून ‘एसओपी’ अर्थात ‘Standard Operating Procedure’ (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यासाठी ‘ड्रोन’चा वापराबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ड्रोन पायलट अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातील. असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहे.

मधुमक्षिका पालनातून क्रांती घडवावी (Agri Technology In Farming)

मधुमक्षिका पालनासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून 50 पेटींसाठी शेतकऱ्यांना साहाय्य केले जाते. यात राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आतापर्यंत 362 शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु केला आहे. या सर्व शेतकऱ्यांना एकत्रितपणे 5 कोटी 23 लाखांचे अनुदान सरकारकडून (Government subsidy) देण्यात आले आहे. तर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याला लोकशाही दिन पाळला जातो. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित असतात. त्या दिवशी कृषी अधिकारी उपस्थित राहिल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करता येणे शक्य होईल. अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोन्हे यांनी केली होती. त्यावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी याचा विचार करता येईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले आहे.

error: Content is protected !!