Agricultural Commodity Export: भारतातून निर्यात होणारा शेतमाल अधिक काटेकोरपणे तपासणी करणार – युरोपीय महासंघाचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: युरोपीय देशांत आयात होणाऱ्या भारतीय शेतीमालांमध्ये (Agricultural Commodity Export) कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे व त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Agricultural Commodity Export).

भारतातून युरोपीय देशांमध्ये निर्यात होणाऱ्या विविध शेतीमालांमध्ये (Agricultural Commodity Export) कढीपत्ता, भुईमूग, ढोबळी मिरची, नागवेली पाने आदींचा समावेश होतो. यामध्ये कीडनाशकांचे अवशेष व अफ्लाटॉक्सीन सारख्या शेतीमालाचे प्रमाण आढळण्याविषयी कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) निश्‍चित करण्यात आली आहे. शेतीमाल तपासणी प्रक्रियेसंबंधीच्या वर्गवारीत कढीपत्याचा समावेश परिशिष्ट एक (ॲनेक्शर वन) वरून दुसऱ्या परिशिष्टात करण्यात आला आहे.

तपासणीच्या अधिकृत नियंत्रण प्रक्रियेत वाढ केली आहे. युरोपात मालाचा प्रवेश झाल्यानंतर नमुन्यातील घटकांचा आढळ व तपासणी या प्रक्रियेची तीव्रता वा संख्या ५० टक्के ठेवण्यात आली. त्यावरील अधिकृत नियंत्रण वाढवले आहे. त्याचबरोबर संबंधित शेतीमालाच्या नमुन्याची कीडनाशक अवशेषांसाठी तपासणी झाली आहे व त्यात युरोपीय महासंघाच्या कायदा नियमावलीनुसारचा अवशेषांचा आढळ नाही असे अधिकृत प्रमाणपत्र गरजेचे आहे. भारतीय भुईमुगात अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकाचे अंश आढळू शकतात. व त्याचा मानवी आरोग्याला धोका पोहोचू शकतो या मुद्द्याला युरोपीय महासंघाने अधिक महत्व दिले आहे. त्यादृष्टीने त्याच्या तपासण्याही ५० टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.

भारतीय नागवेलीची (खाऊची) पाने ज्या युरोपीय देशात आयात होतील (Agricultural Commodity Export) तेथे अधिकृत यंत्रणेमार्फंत त्यावरील नियंत्रण पातळीची संख्या वाढविली आहे. त्याचा समावेश युरोपीय कायदे नियमावलीच्या परिशिष्ट दोनवरून एकमध्ये केला आहे. भारतीय ढोबळी मिरचीचा समावेश सद्य:स्थितीत परिशिष्ट दोनमध्ये आहे. मात्र नमुन्यातील घटकांचा आढळ व तपासणी या प्रक्रियेची संख्या २० वरून १० टक्क्यांवर ठेवली आहे.

हे सुद्धा वाचा: फळे- भाजीपाल्याची निर्यात वाढणार सरकारने केलाय हा मोठा करार

विविध घटकांवर होतोय नियंत्रण (Effect of Decision On Different commodity )
केवळ भुईमूगच नव्हे तर अफ्लाटॉक्सीनचा धोका ओळखून भारतीय जायफळाच्या तपासण्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने जुलै २०१९ पासूनच घेतला आहे. त्यानुसार युरोपीय सदस्य देशांकडून उपलब्ध होत असलेल्या माहितीच्या आधारे या नियमावलीच्या पूर्ततेमध्ये सुधारणा झाली आहे.

अन्नपदार्थांबरोबरच युरोपीय देशांव्यतिरिक्त अन्य देशांतून येणाऱ्या पशुखाद्यांसाठीही नियमावली निश्‍चित करण्यात  आली आहे. यामध्ये कीडनाशक अवशेष व अफ्लाटॉक्सीन यांच्या व्यतिरिक्त बुरशीवर आधारित अन्य विषारी पदार्थ, सूक्ष्मजीवांचा संसर्ग वा दूषितीकरण, पेंटाक्लोरोफिनॉल व डायक्झीन्स आदी घटकांच्या आढळावरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

युरोपीय महासंघाच्या (रास्फ RASFF) या संस्थेकडून अलीकडेच इशारा देण्यात आला आहे. यामध्ये दूषित झालेले अन्न व अप्राणीजन्य पशुखाद्यामुळे मानवी आरोग्याला प्रत्यश्र किंवा अप्रत्यक्ष गंभीर धोके उद्‍भवू शकतील असे सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीनेच मानवी आरोग्याचे संरक्षणाच्या दृष्टीने युरोपीय सदस्य देशांकडून अन्नपदार्थांचे वर्गीकरण परिशिष्ट एक व दोनमध्ये करण्यात आले आहे.

रास्फद्वारा उपलब्ध तपशीलाचा आधारे कीडनाशकांच्या अवशेषांमुळे इजिप्तमधून येणाऱ्या संत्र्यांपासून नवा धोका सूचित करण्यात आला आहे (Agricultural Commodity Export). अशा शेतीमालांना परिशिष्ट एकमध्ये वर्ग ेकेले आहे. त्याचबरोबर भारत व पाकिस्तानातून येणाऱ्या भातामध्येही कीडनाशकांच्या अवशेषांचा धोका सूचित केला असून त्यादृष्टीने युरोपीय महासंघासाठी अधिकृत नियंत्रण पातळी वाढविणे गरजेचे ठरले.

error: Content is protected !!