Agriculture Awards : राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यातील नावे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून (Agriculture Awards) शेतकरी व शेतीशी संबंधित संस्थांना दिल्या जाणाऱ्या सरकारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 2020 पासून कोरोनाच्या काळापासून हे पुरस्कार दिले गेलेले नव्हते. मात्र, आता 2020, 2021 व 2022 अशा तीनही वर्षांचे कृषी पुरस्कार (Agriculture Awards) सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा जीआर (शासन निर्णय) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

कोणते पुरस्कार दिले जातात? (Agriculture Awards Maharashtra Government)

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करत शेती फुलवत आहेत. शेतीमध्ये अशीच उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी, शेतकरी संस्था आणि अधिकाऱ्यांचा सरकारकडून पुरस्कार (Agriculture Awards) देऊन, दरवर्षी गौरव केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सरकारच्या कृषी व फलोत्पादन क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या शेतकरी, शेतकरी संस्थांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन गौरविले जाते.

वाचा संपूर्ण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची नावे

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेतकरी संस्था आणि कृषी विभागातील पुरस्कार (Agriculture Awards) प्राप्त अधिकाऱ्यांची मागील 2020, 2021 व 2022 अशा तीनही वर्षांची यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून, राज्य सरकारचा जीआर वाचा : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402231503291801……pdf)

लवकरच पुरस्कारांचे वितरण

दरम्यान, राज्य सरकारने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, शेतकरी संस्था आणि कृषी अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांच्या रकमेत अलीकडेच चौपट वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा शेती क्षेत्रातील पुरस्कारांची रक्कम जवळपास 50 हजार ते तीन लाखांपर्यंत वाढलेली आहे. लवकरच या सर्व शेती क्षेत्रातील पुरस्कारांचे एका कार्यक्रमाचे आयोजित करून, वितरण केले जाणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!