Agriculture Business : नाशिकच्या शेतकऱ्याने उभी केली 525 कोटींची कंपनी; जोडलेत 10,000 शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात एकीला खूप महत्व (Agriculture Business) असते. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. मात्र आता याच एकतेतून शेतीमध्ये नवीन क्रांती घडल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी पदवी आणि कृषी पदवीत्तरपर्यंत शिक्षण झालेले, इतकेच नाही तर राहुरी कृषी विद्यापीठातून स्वर्ण पदक मिळवलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी वेगळा मार्ग निवडला. 2010 साली त्यांनी 100 शेतकऱ्यांना सोबत घेऊन, सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आज विलास शिंदे यांची सह्याद्री फार्म्स कंपनी वार्षिक 525 कोटी रुपयांचा टर्नओव्हर (Agriculture Business) करत आहे.

10000 शेतकऱ्यांसोबत मिळवले यश (Agriculture Business Sahyadri Farms Company Nashik)

सह्याद्री फार्म्स कंपनीचे (Agriculture Business) नाशिक जिल्ह्यात 10000 शेतकऱ्यांसह 25000 एकर जमिनीवर कार्यक्षेत्र आहे. ही कंपनी दररोज 1000 टन फळे आणि भाजीपाल्याची उत्पादन करते. कंपनी देशातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी आहे. सह्याद्री फार्म्स कंपनी दरवर्षी 23000 मेट्रिक टन द्राक्ष, 17000 मेट्रिक टन केळी, 700 मेट्रिक टनांच्या आसपास डाळिंब निर्यात करते. दरम्यान, 47 वर्षीय विलास शिंदे यांनी म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 525 कोटी रुपयांचा टर्नओव्हर केला आहे. याशिवाय कंपनी देशातील सर्वात मोठी टोमॅटो खरेदीदार कंपनी आहे. असेही ते सांगतात.

42 देशांमध्ये शेतमालाची निर्यात

सह्याद्री फार्म्स कंपनीचे शेतकरी थॉमसन, क्रिमसन, सोनाका, शरद सीडलेस, फ्लेम आणि एआरआरए यांसारख्या द्राक्षांच्या प्रजातींची शेती करतात. सह्याद्री फार्म्स कंपनीचे ६० टक्के फळे आणि भाजीपाला विदेशात निर्यात (Agriculture Business) केला जातो. तर ४० टक्के फळे आणि भाजीपाल्याची निर्यात देशांतर्गत बाजारात केली जाते. सह्याद्री फार्म्स कंपनीचे संस्थापक विलास शिंदे सांगतात, कंपनीकडून रशिया, अमेरिका आणि विविध युरोपीय देशांसह 42 देशांमध्ये मालाची निर्यात केली जाते. याशिवाय सह्याद्री फार्म्स कंपनीकडून 40 हेक्टरहुन अधिक क्षेत्रावर आरा या द्राक्ष वाणाचे सफेद, लाल, काळे द्राक्ष उगवली जातात.

कंपनीशी जोडलेत अनेक ग्राहक

सह्याद्री फार्म्स कंपनीचे संस्थापक विलास शिंदे सांगतात, कंपनीसोबत मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये अनेक ग्राहक थेट जोडले गेले आहेत. २०१८ मध्ये कंपनीने २५० कोटी रुपये खर्च करून मोहाडी येथे 100 जमिनीवर एक फळ प्रक्रिया उद्योग देखील उभारला आहे. त्यांच्या कंपनीमध्ये सध्या १२०० लोक काम करतात. याशिवाय कंपनीसोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांची उत्पन्नात 25 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. घाऊक बाजारात द्राक्षाला ३५ रुपये किलोचा दर मिळत, असताना द्राक्ष निर्यातीतून शेतकरी सरासरी 67 रुपये प्रति किलोचा दर मिळवत आहे. अर्थात कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळवण्यास मदत झाली आहे.

error: Content is protected !!