Agriculture Business : ‘या’ फळाची लागवड करून मिळवा 1 किलोमागे 1000 रुपये; जाणून घ्या लागवड प्रक्रिया अन रोपे कुठे मिळतील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Business) : सध्या शेतकऱ्यांचा कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे. कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतीमध्ये कष्टाची पिके घेणे आता अवघड झाले आहे. औषध फवारणी, मशागत यांचा वाढलेला खर्च पाहता शेती न परवडणारी बनत चालली आहे. यापार्श्वभूमीवर अनेक शेतकरी वेगळ्या पिकांची लागवडीसाठी निवड करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाच्या लागवडीबाबत माहिती सांगणार आहोत. विशेष बाब म्हणजे या फळाला बाजारात १ किलोला १००० रुपये असा दर मिळतो आहे.

आजवर आपण चंदन, तुळस, कोरफड शेतीबाबत ऐकले आहे. तसेच जिरॅनियम शेतीतुन नफा मिळत असल्याच्या गोष्टीसुद्धा आपण पाहत आहोत. परंतु आज आम्ही तुम्हाला ब्लूबेरी शेतीबाबत माहिती देणार आहोत. आपण या फळपिकाची शेती केली तर मालामाल होऊ शकतो. तुम्ही शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर हि शेती शेतकर्‍यांसाठी खूप फायद्याचे आहे. त्यासाठी ‘ब्लूबेरी’ या फळपिकाची शेती करावी लागेल. देशातील अनेक भागांमध्ये अनेक शेतकरी ‘अमेरिकन ब्लूबेरी’ या फळपिकाची शेती करत आहेत. ब्लूबेरी हे फळ १ हजार रु. प्रति किलो दराने विकून अनेक शेतकरी चांगला नफादेखील मिळवत आहेत.

रोपे कुठे मिळतील?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पाहिजे त्या जातीची रोपे तुम्ही घरी बसून मागवू शकता. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही रोपवाटिका मालकाशी संपर्क करून त्यांच्याकडे तुम्हाला हवी असणारी रोपे आहेत का हे विचारू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचे आहे. इथे तुम्हाला अतिशय स्वस्तात सर्व प्रकारची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (Agriculture Business)

अशी करा ब्लूबेरीची शेती

ब्लूबेरी हे एक सुपरफूड आहे. या पिकाची लागवड केल्यानंतर झाडापासून जवळपास 10 वर्षापर्यंत फळ मिळते. भारतामध्ये ब्लूबेरीच्या विविध जातींची लागवड केली जाते. लागवड करण्याआधी जमिनीची योग्यप्रकारे मशागत केली जाते. एप्रिल-मे महिन्यात या पिकांची लागवड केली जाते. तर फेब्रुवारी- मार्च महिन्यात फळांचे उत्पादन सुरू होते. त्यानंतर पावसाच्या सुरुवातीला या झाडांची छाटणी केली जाते.

देखभाल कशी करावी?

पावसाळ्यापासून ते सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत ब्लूबेरीच्या झाडांची छाटणी केल्यानंतर त्या झाडाला नवीन फुटवे येतात. तसेच फुले लागतात. दरवर्षी झाडांची छाटणी केल्यामुळे नवीन फुटव्यांची तसेच फुलांची संख्या वाढते. तसेच फळांचा आकार वाढतो. त्यामुळे उत्पादनात देखील मोठी वाढ होते.

उत्पन्न किती मिळेल?

एका एकरामध्ये जवळपास 3000 झाडांची लागवड करता येते. ब्लूबेरीच्या एका झाडापासून 2 कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. बाजारात या फळाची 1 हजार रु. प्रतिकिलो दराने विक्री होते. त्यामुळे ब्लूबेरी या फळझाडाची लागवड आर्थिक फायदा मिळवून देऊ शकते.

error: Content is protected !!