Agriculture Business : शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेवगा ही एक बहुगुणी वनस्पती म्हणून ओळखली जाते. शेवगा ही 108 रोगांचे निदान करणारी आरोग्यदायी वनस्पती (Agriculture Business) आहे. शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगाची भाजी करतात. शेवगा अनेक शतकांपासून त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी आणि आरोग्यदायी लाभांमुळे विविध स्वरूपात वापरला जातो. जागतिक स्तरावर शेवग्याच्या उत्पादनांची मागणी उदाहरणार्थ शेवग्याच्या पानांची पूड, शेवग्याचे तेल यात सतत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेवगाआधारित प्रक्रिया उद्योगांबद्दल (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.

शेवग्यापासून अनेक पदार्थ तयार होतात (Drumstick Agriculture Business)

शेवग्याच्या बिया व पानाची पावडरचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. जसे की, पावडरचा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये (Agriculture Business) केला जातो. पावडरचा काही (20-40 टक्के) प्रमाणात उपयोग करून बिस्कीट, कुकीज, केक, चॉकलेट मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातील खाण्यासाठी उपयोग होतो, त्यानंतर पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

शेवगा प्रक्रिया उद्योग

1. शेवग्याच्या पानांची भुकटी : सुरूवातीला पाने झाडावरून काढून स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर पाने सावलीत 2 ते 3 दिवस वाळवावीत. (उन्हामध्ये वाळवल्यास अ जीवनसत्त्व कमी होते) वाळलेल्या पानांची मिक्सर किंवा पल्वलाईजरमध्ये बारीक करून भुकटी तयार करून घ्यावी. साधारणतः 50 किलो शेवग्याच्या पानापासून आपल्याला 12 ते 15 किलो पावडर मिळते. तयार केलेली शेवग्याच्या पानाची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा पाउचमध्ये कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते, तयार झालेल्या पावडरीचा उपयोग बेकरी उत्पादनात केला जातो.

2. शेवग्याच्या पानांचा रस : सुरूवातीला शेवग्याची 10 किलो ताजी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत व तिला मंद आचेवर 5 मी. गरम करावीत त्यांनंतर थंड करून घ्यावीत. शेवग्याच्या 10 किलो पानामध्ये 1 लिटर पाणी टाकून हॅमर मिलच्या साह्याने (Agriculture Business) बारीक करून (दळून) घ्यावीत. तयार झालेल्या शेवग्याचा शेंगाचा रस गाळून घ्यावा व त्यामध्ये 250 ग्रॅम साखर व 20 ग्रॅम जिरे पावडर टाकून मिसळून घ्यावीत. तयार झालेल्या रसाला 3 ते 4 अंश तापमानाला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

3. शेवग्याच्या पानाचा चहा : सुरूवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत व सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळवलेली पाने चहा पूडप्रमाणे बारीक करून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी व साखर टाकून मिसळून घ्यावे. तयार झालेला शेवग्याच्या पानाचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबू रस मिसळून घ्यावे. तयार झालेला चहा अतिशय गुणकारी असून चवीला ही चांगला लागतो.

4. शेवगा पानाची कॅप्सूल : जिलेटीनपासून तयार केलेल्या रिकाम्या कॅप्सूनमध्ये शेवगाची पानाची भुकटीचा वापर करून कॅप्सूल तयार करता येतात.

5. शेवग्याच्या बियांची पावडर : शेवग्याच्या बियामध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात जसे की प्रथिनांचे प्रमाण चांगले आहे. शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये घेऊन 10 ते 15 मिनिटे उकळून घ्याव्यात, त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग काढून घ्यावा. त्यानंतर बिया सूर्यप्रकाशात वाळवून घ्याव्यात. बिया वाळल्यानंतर त्याला पल्वरायजर (पावडर करण्याचे यंत्र) मध्ये बारीक करून घ्यावात. बियांची पावडर तयार करून, त्याचा उपयोग स्वासेस, सिजनींगमध्ये केला जातो.

error: Content is protected !!