Agriculture Business : जांभळापासून सुरु करा, ‘हा’ भन्नाट बिझनेस; पावडरपासून होईल बक्कळ कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ शेती (Agriculture Business) केली जाते. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात शेतकरी वर्षानुवर्षे जांभळाचे पीक घेत आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला जांभूळ या पिकापासून करता येणाऱ्या एका छोटेखानी व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रामुख्याने शेतकरी आपल्या भागात अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला जांभूळ खराब झाल्यास तसाच सोडून देतात. मात्र, तुम्ही अशावेळी त्या टाकाऊ आणि खराब झालेल्या जांभळांच्या बियांपासून पावडर तयार करून, त्याची विक्री करू शकतात. याशिवाय अशा आपत्तीच्या वेळी तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही असा खराब झालेला जांभूळ खरेदी (Agriculture Business) करू शकतात.

विटॅमिन्स, खनिजांचे भांडार (Agriculture Business)

आंबड गोड जांभूळ फळ अनेक विटॅमिन्स आणि खनिजांचे भांडार आहे. आयुर्वेदात तर जांभळाच्या औषधी गुणधर्मांची आख्याने सापडतात. सध्या सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देत असताना जांभळाच्या बिया शेतकऱ्यांना चांगली कमाई करून देण्याचा मार्ग ठरत आहे. जांभूळ खाऊन त्याच्या बीया फेकून दिले जाते. पण याच जांभळाच्या बीयांपासून बनवलेल्या पावडरला आजार बरे करण्यासाठी वापरले जाते.

पावडरच्या मागणीत वाढ

जांभळाच्या बीयांमध्ये मधूमेह आणि बीपी आवाक्यात ठेवण्याची शक्ती असल्याचे सांगितले जाते. तसेच या जांभूळ बीयांचे चूर्ण पाचनशक्ती वाढवणारे असून अनेकजण चहामध्येही आवर्जून या पावडरचा वापर करतात. सध्या अनेकजण काजू, बदाम तसेच वाळलेल्या फळांची पावडर बनवायचा व्यवसाय करत असताना जांभळाच्या बीयांची पावडरही बनवू लागले आहेत. याच्या आयुर्वेदिक आणि पचनाशी संबंधित आजार दूर करण्याच्या क्षमतेमुळे या पावडरच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे.

चहातही होतो जांभूळ बीज पावडरचा वापर

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या पित्त व पचनाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. यासाठी अनेकजण चहामध्ये जांभळाच्या बीयांच्या पावडरचाही वापर करू लागले आहेत. या पावडरमध्ये ॲन्टिऑक्सिडन्ट गुणधर्म असून यूरिन इन्फेक्शन व अन्य आजारांच्या संक्रमणासाठी या चहाला पसंती दिली जाते. मधूमेह व रक्तदाबाला मर्यादेत ठेवणारे फळ अशी जांभळाची ओळख असली तरी व्यावसायिकदृष्ट्याही त्याचे महत्व अधिक आहे. अनेक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना जांभळाच्या बीयांचा प्रक्रीया उद्योग सुरु करण्यास संधी आहे.

error: Content is protected !!