Agriculture Business : विदेशातील नोकरी सोडली, अभियंता दांपत्य करतंय जिरेनियम तेलाचे उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोपमधील नोकरी सोडून (Agriculture Business) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे व हर्षाली लोकरे या अभियंता दांपत्याने जिरेनियम तेलाच्या उत्पादन घेतले आहे. भविष्यात जिरेनियमपासून उत्पादित उत्पादने व निर्यातासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे हे मेकॅनिकल अभियंता आहेत. शिक्षण संपल्यानंतर तेजस यांनी युरोपमध्ये एमएस शिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲंड लॉजिस्टीक्स’ या विषयात त्यांनी हे शिक्षण घेतले. त्यानंतर युरोपातील नोकरी सोडून (Agriculture Business) ते भारतात परतले.

खरेदीदारासोबत खरेदी करार (Agriculture Business Engineer Couple)

मायदेशात परतल्यानंतर काही स्वतःचे उत्पादन तयार करावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. जिरेनियम ऑईल तयार करण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी जिरेनियम तेल खरेदीदारासोबत खरेदी करार केला. त्यांनी जमीन भाड्याने घेऊन कामास सुरवात केली. कोणतेही रासायनिक खत न वापरता नैसर्गिक पध्दतीने त्यांनी उत्पादन घेण्याचे ठरवले. बाजारात जिरेनियमची रोपे महाग असल्याने त्यांनी वेगळ्या पध्दतीने या खर्चात बचत करण्याचे ठरवले. त्यांनी रोपांच्या ऐवजी कंद किंवा स्टीक लावणारा शेतकऱ्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना कमी किमंतीत या स्टीक मिळाल्या.

उभारलाय स्वतःचा प्लांट

त्यानंतर त्यांनी उत्पादन हाती येईपर्यंत तेलाचा स्वतःचा प्लांट उभा केला. पहिल्यांदा उत्पादन हाती आल्यानंतर त्याचे थेट तेलात रुपांतर करण्यात ते यशस्वी झाले. आता त्यांनी या उत्पादनामध्ये एक लिटर तेलासोबत १०० लिटर सुगंधी जलाचा उपयोग करण्याचे ठरवले. या पाण्याला ‘गुलाब जल’ असे म्हटले जाते. लवकरच त्यांनी त्यांचे उत्पादन निर्यात करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.

सरकारी कर्ज मंजूर

तेजस गुराडे सांगतात, “आम्ही जिरेनियम तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. लवकरच त्याची निर्यात करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. या शिवाय अन्य उत्पादने देखील बाजारात आणण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून कर्ज मंजूर झाले आहे. ज्यामुळे आपण जिरेनियम तेलाच्या अर्थकारणात नव्या मार्गांचा अवलंब करून, येत्या काळात अधिकाधिक अर्थार्जन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

error: Content is protected !!